पाकला सूर गवसला; यूएईवर ७ गड्यांनी मात

By admin | Published: March 1, 2016 03:02 AM2016-03-01T03:02:45+5:302016-03-01T03:02:45+5:30

शोएब मलिक (६३) आणि उमर अकमल (५०) यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने सोमवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा सात गडी राखून पराभव

Pakalur sur gavasala; UEI beat by 7 wickets | पाकला सूर गवसला; यूएईवर ७ गड्यांनी मात

पाकला सूर गवसला; यूएईवर ७ गड्यांनी मात

Next

मिरपूर : शोएब मलिक (६३) आणि उमर अकमल (५०) यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने सोमवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा सात गडी राखून पराभव करीत निराशा दूर केली. यूएईच्या ६ बाद १२९ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकची सुरुवातीला ३ बाद १७ अशी पडझड झाली. पण, शोएब मलिकने ४९ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह संयमी नाबाद ६३ धावा फटकविल्या. त्याला समर्थ साथ देत यष्टिरक्षक-फलंदाज उमर अकमलने ४६ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५० धावा ठोकल्या. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ११४ धावांची नाबाद भागीदारी करीत १८.४ षटकांत ३ बाद १३१ धावांवर आठ चेंडू आधीच सामना संपविला. भारताकडून पराभूत झालेल्या पाकचा हा पहिलाच विजय ठरला. यूएई संघ श्रीलंका आणि बांंगलादेशकडून पराभूत झाला होता. आज पाकने त्यांना नमविताच स्पर्धेतील त्यांचे आव्हान
संपुष्टात आले.

Web Title: Pakalur sur gavasala; UEI beat by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.