तेव्हा मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता पाकची ड्रेसिंग रुम : शोएब

By admin | Published: October 17, 2016 08:58 PM2016-10-17T20:58:15+5:302016-10-17T20:58:15+5:30

१९९६ मध्ये मॅच फिक्सिंगने अत्युच्य पातळी गाठली होती. पाकिस्तानची ड्रेसिंग रुम या काळात मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता, असा दावा पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला

Pakhichi dressing room was made a venue for match-fixing: Shoaib | तेव्हा मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता पाकची ड्रेसिंग रुम : शोएब

तेव्हा मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता पाकची ड्रेसिंग रुम : शोएब

Next

ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १७ : १९९६ मध्ये मॅच फिक्सिंगने अत्युच्य पातळी गाठली होती. पाकिस्तानची ड्रेसिंग रुम या काळात मॅच फिक्सिंगचा अड्डा बनला होता, असा दावा पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला. अख्तरने जियो चॅनलशी बोलताना सांगितले की,ह्य१९९६ साली आमच्या ड्रेसिंग रुममधील माहोल सर्वांत खराब झाला होता हे मी विश्वासाने सांगतो.
क्रिकेटवगळता अन्य बाबींचा वावर सुरू होता.

ड्रेसिंग रुममध्ये क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले होते. पाकिस्तानचा माजी दिग्गज जावेद मियांदाद आणि माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी यांच्यातील मतभेदांवर तोडगा निघाल्यानंतर अख्तरने हा नवा वाद उकरून काढला. या वादामुळे मॅच फिक्सिंगचे भूत पुन्हा डोके वर काढणार आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली.

अख्तरने मात्र मियांदाद आणि आफ्रिदी यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याचा मला आनंद वाटतो, असे म्हटले आहे. तो म्हणाला, हे प्रकरण न्यायालयात गेले असते तर अनेक वाईट गोष्टींना उजाळा मिळाला असता. नव्याने अनेक चेहरे वादाच्या भोवऱ्यात अडकले असते. नको त्या बाबी पुढे आल्या असत्या, असा माझा दावा आहे. २०१० मध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमेर याला मी इंग्लंड दौऱ्यात शंकास्पद लोकांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला होता.

Web Title: Pakhichi dressing room was made a venue for match-fixing: Shoaib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.