पाकची बांगलादेशवर मात

By admin | Published: March 17, 2016 03:52 AM2016-03-17T03:52:36+5:302016-03-17T03:52:36+5:30

शाहीद आफ्रिदीच्या (१९ चेंडूंत ४९ धावा व २ बळी) अफलातून अष्टपैलू खेळीच्या बळावर पाकिस्तानने बांगलादेशला ५५ धावांनी नमवीत विजयी सलामी दिली.

Pakistan beat Bangladesh | पाकची बांगलादेशवर मात

पाकची बांगलादेशवर मात

Next

कोलकाता : शाहीद आफ्रिदीच्या (१९ चेंडूंत ४९ धावा व २ बळी) अफलातून अष्टपैलू खेळीच्या बळावर पाकिस्तानने बांगलादेशला ५५ धावांनी नमवीत विजयी सलामी दिली.
ईडन गार्डन येथे हा सामना झाला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजी स्वीकारली. अहमद शेहझाद, मोहम्मद हाफीज यांची अर्धशतकी खेळी व शाहीद आफ्रिदीच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद २०१ धावा टोलावल्या. विजयासाठी २०२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांगलादेशचा डाव २० षटकांत ६ बाद १४६ धावांत संपुष्टात आला. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या प्रतिकारामुळे पाकिस्तानला बांगलादेशचा डाव गुंडाळता आला नाही.
तमिम इक्बाल (२० चेंडूंत २४), साबिर रेहमान (१९ चेंडूंत २५), मुशफिकुर रहीम (१८) फार मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. शकिब अल हसन याने ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार टोलावत ५० धावांची नाबाद खेळी करून काहीशी झुंज दिली. तर, मशरफी मुर्तझाने ९ चेंडूंत २ चौकार व १ षटकार फटकावीत नाबाद १५ धावा केल्या. शाहीद आफ्रिदी व मोहम्मद आमीरने प्रत्येकी २, तर मोहम्मद इरफान याने एक बळी घेतला.
तत्पूर्वी सालमीवीर शारजील खान (१८) झटपट बाद झाल्यानंतर अहमद शेहझाद व मोहम्मद हाफीज यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागिदारी केली. शेहझादने ८ चौकारांच्या साहाय्याने ३९ चेंडूंत ५२ धावा, तर मोहम्मद हाफीजने ७ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने ४२ चेंडूंत ६४ धावा टोलावल्या. शेहझाद तंबूत परतल्यानंतर आलेल्या शाहीद
अफ्रिदीने तडाखेबंद फलंदाजी
करीत अवघ्या १९ चेंडूंत ४९ धावा टोलावल्या. त्याने ४ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करीत आपली खेळी साजरी केली.

धावफलक :
पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद २०१, शरजील खान १८ त्रि.गो. अराफत सनी, अहमद शेहझाद झे. महमुदुल्लाह गो. साबिर रहमान ५२, मोहम्मद हाफीज झे. सौम्या सरकार गो. अराफत सनी ६४, शाहीद अफ्रिदी झे. महमदुल्लाह गो. तस्कीन अहमद ४९, शोएब मलिक नाबाद १५.
बांगलादेश : २० षटकांत ६ बाद १४६, तमिम इक्बाल झे. इमाद वसिम गो. शाहीद आफ्रिदी २४, साबिर रहमान त्रि. गो. शाहीद आफ्रिदी २५, शाकिब अल हसन नाबाद ५०, मशरफी मुर्तझा नाबाद १५

Web Title: Pakistan beat Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.