पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकची निवृत्तीची घोषणा
By admin | Published: April 6, 2017 03:01 PM2017-04-06T15:01:23+5:302017-04-06T15:04:19+5:30
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हक याने निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लमाबाद, दि. 6 - पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हक याने निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लाहोरमध्ये एका पत्रकार परिषदेत त्याने हा निर्णय जाहीर केला. वेस्टइंडीज दौ-यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याचं त्याने सांगितलं.
21 एप्रिलपासून पाकिस्तान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्टइंडीज दौ-यावर जाणार आहे. ही मिसबाहची अंतिम मालिका असणार आहे. बुधवारी विस्डेनच्या वर्षातील 5 सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंमध्ये मिसबाहचा समावेश झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याच्या कर्णधारपदावर टीका होत होती.
पाकिस्तानला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचवल्यानंतर अनेक सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्कारावा लागला. नुकतंच सलग सहा कसोटी सामने हारण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. न्यूझीलंडविरूद्ध 2-0 ने तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3-0 ने त्यांचा पराभव झाला होता. तसंच स्वतः मिसबाहच्या खेळातील सातत्यही कमी झालं होतं. त्यामुळे मिसबाहने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.