पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक!

By admin | Published: June 17, 2017 08:46 PM2017-06-17T20:46:02+5:302017-06-17T20:46:02+5:30

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार हे निश्चित झाल्यापासून दोन्ही देशांच्या क्रिकेट जगतातील वातावरण चांगलेच तापलेय.

Pakistan: Fearless and dangerous! | पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक!

पाकिस्तान : बेभरवशाचा आणि धोकादायक!

Next

 बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार हे निश्चित झाल्यापासून दोन्ही देशांच्या क्रिकेट जगतातील वातावरण चांगलेच तापलेय. वास्तव जगाची आभासी प्रतिकृती बनलेल्या सोशल मीडियावर त्याचे प्रतिबिंब ठळकपणे दिसून येतेय. भारतात तर पाकिस्तानला चिरडण्याची आणखी एक संधी मिळाल्याचे मानून ऐन पावसाळ्यात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झालीय. 
 
भारतीय क्रिकेटप्रेमींचा विराटसेनेवर असलेला विश्वास त्यातून जाणवतोय. पण मैदान युद्धाचे असो वा खेळाचे आपल्या प्रतिस्पर्ध्याला गृहीत धरून चालत नाही. त्यात समोर पाकिस्तानसारखा प्रतिस्पर्धी असला म्हणजे थोडी जास्तच खबरदारी घ्यावी लागते.
 
आता तुम्ही म्हणाल भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जागतिक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी धवन, रोहित आणि कोहली प्रतिस्पर्धी गोलंदाजीसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. एक सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी चांगली झालीय. मग भारतीय संघ आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद यात अडचण ती कोणती? खरंच अडचण काहीच नाही. पण पाकिस्तानचा बेभरवाशीपणा हेच विराटसेनेसमोरचे खरे आव्हान असेल. 
 
एखाद्या दिवशी हा संघ अगदी सुमार संघासमोर गारद होऊ शकतो. तर दिवशी पाकिस्तानी संघ जगातील सर्वोत्तम संघाला पराभूत करू शकतो. यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांनी असा चमत्कार करून दाखवलाय. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडला ते पराभूत असे सामना सुरू होण्यापूर्वी खुद्द पाकिस्तानच्या कर्णधारालाही वाटलं नसेल, पण त्यांंनी ते करून दाखवले. सध्याचा त्यांचा संघ इम्रान खान, वासिम अक्रम यांच्या काळातील तुल्यबळ संघांसारखा नाही. पण त्या संघासारखी थोडीफार लढाऊवृत्ती त्यांच्याकडे जरूर आहे.
 
शोएब मलिक मोहम्मद हाफीजसारखे अनुभवी खेळाडू आणि सर्फराझ अहमद, बाबर आझम, फकर झमान, अझर अली, मोहम्मद आमीर असे गुणवान युवा खेळाडू आहेत त्यांच्याकडे. ते पूर्वीप्रमाणे विध्वंसक नसले तरी धोकादायक जरूर आहेत. थोडीशी संधी मिळाली तरी ते आपली डोकेदुखी वाढवू शकतात. त्यामुळे विराट कोहली आणि कंपनीला या सामन्यात अजिबात बेफिकिरी दाखवून चालणार नाही.

Web Title: Pakistan: Fearless and dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.