ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानची सरशी

By Admin | Published: March 11, 2016 04:56 PM2016-03-11T16:56:23+5:302016-03-11T17:46:17+5:30

ईडन गार्डनवर पाकिस्तानने ५ सामने जिंकले असून भारताला केवळ १ विजय मिळवता आला तर ५ सामने अनिर्णीत राहिले.

Pakistan Gardens on Eden Gardens till date | ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानची सरशी

ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानची सरशी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ११ - वर्ल्डकपच्या सर्व प्रकारांमध्ये भारताची पाकिस्तान विरोधातील आतापर्यंतची कामगिरी अजिंक्य असली तरी, ईडन गार्डनची आकडेवारी मात्र पाकिस्तानच्या बाजूने जाणारी आहे. वनडे आणि कसोटीमध्ये मिळून भारत पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर आतापर्यंत ११ सामने झाले. त्यापैकी भारताने फक्ते १ सामना जिंकला असून, ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत तर  अन्य ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. 
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये १ ऑक्टोंबर १९७८ रोजी क्वेटाच्या अयुब नॅशनल स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना झाला. ४ धावांनी भारताने हा सामना जिंकला होता. ४० षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने १७० धावा केल्या. पाकिस्तानला १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. ५१ धावा करुन ३८ धावात दोन विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले होते. 
 
१८ फेब्रुवारी १९८७ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर पहिला सामना झाला. अटीतटीचा झालेला हा सामना पाकिस्तानने तीन चेंडू आणि दोन गडी राखून जिंकला होता. भारताने विजयासाठी दिलेले २३९ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने ३९.३ षटकात पार केले होते. नाबाद ७२ धावांची खेळी करणा-या सलीम मलिकला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या सामन्यात भारताचा सलामीवीर कृष्मचारी श्रीकांतने १२३ धावांची शतकी खेळी केली होती. 
 
२८ ऑक्टोंबर १९८९ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर दुसरा एकदिवसीय सामना झाला.  हा सामना पाकिस्तानने ७७ धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने ५० षटकात २७९ धावा केल्या. भारताचा डाव २०२ धावात आटोपला. नाबाद ४७ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा कर्णधार इमरान खानला सामनावीराच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. 
 
१३ नोव्हेंबर २००४ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये तिसरा एकदिवसीय सामना झाला. पाकिस्तानने एक षटक आणि सहा गडी राखून हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करणा-या भारताने २९२ धावा केल्या. पाकिस्तानने ४९ षटकात हे आव्हान पार केले. १०८ धावांची खेळी करणारा सलामीवीर सलमान बट्टला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले. 
 
३ जानेवारी २०१३ मध्ये भारत-पाकिस्तानमध्य ईडन गार्डनवर चौथा एकदिवसीय सामना झाला. प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने २५० धावा केल्या. भारताचा डाव १६५ धावांवर आटोपला. पाकिस्तानने हा सामना ८५ धावांनी जिंकला. १०६ धावांची शतकी खेळी करणारा सलामीवीर नासीर जमशेदला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले. 
 
भारत आणि पाकिस्तानममध्ये १२७ एकदिवसीय सामने झाले. त्यातील ७२ सामने पाकिस्तानने आणि ५१ सामने भारताने जिंकले. पाच सामने रद्द झाले. 
 
१६ ऑक्टोबर १९५२ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर पहिला कसोटी सामना झाला. भारताने हा सामना एक डाव आणि ७० धावांनी जिंकला. 
 
१६ फेब्रुवारी १९९९ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर कसोटी सामना सुरु झाला होता. पाकिस्तानने हा सामना ४६ धावांनी जिंकला होता. पाकिस्तानचा सलामीवीर सईद अन्वर आणि भारताचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथला सामनावीराचा पुरस्कार विभागून देण्यात आला होता. 
 
१६ मार्च २००५ मध्ये भारत आणि पाकिस्तान ईडन गार्डनवर कसोटी सामना खेळला गेला. हा सामना भारताने १९५ धावांनी जिंकला होता. या कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणा-या राहुल द्रविडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 
 
ईडन गार्डन मैदानावरील पाच कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ५९ कसोटी सामने झाले. त्यातील नऊ सामने भारताने तर, १२ कसोटी सामने पाकिस्तानने जिंकले. ३८ कसोटी सामने अर्निर्णीत राहिले होते. 

Web Title: Pakistan Gardens on Eden Gardens till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.