पाकिस्तानने ५५ धावांनी बांगलादेशला लोळवले
By admin | Published: March 16, 2016 07:39 PM2016-03-16T19:39:45+5:302016-03-16T19:39:45+5:30
शाहिद आफ्रिदीच्या आष्ठपैलू खेळीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशला ५५ धावांनी लोळवत टी२० विश्वचषकाच्या अभीयानाची सुरवात विजयाने केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १६ - शाहिद आफ्रिदीच्या आष्ठपैलू खेळीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशला ५५ धावांनी लोळवत टी२० विश्वचषकाच्या अभीयानाची सुरवात विजयाने केली. शाहिद आफ्रिदाने फंलदाजी करताना ४९ धावा आणि गोलंदाजी करताना २ बांगलादेशी फलंदाजाला बाद केले. शेहजाद अहमद (५२), शाहिद आफ्रिदी(४९) आणि माहमद्द हाफिज (६४) यांच्या फलंदाजीनंतर गोंलदाजांनी केलेल्या सुरेख कामगीराच्या जोरावर पाक संघाने बांगलादेश संघाचा ५५ धांवानी दारुण पराभव करत आशिया चषकातील पराभवाची परतफेड केली.
बांगलादेश तर्फे शाकिब अल हसन (५०) तमीम इक्बाल (२०) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. २०१ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ निर्धारीत २० षटकात ६ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारता आली.
शेहजाद अहमद, शाहिद आफ्रिदी आणि माहमद्द हाफिज यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावार पाकिस्तानने बांगलादेशसमोर निर्धारीत २० षटकात २०१ धावांचा डोंगर उभा केला. बांगलादेशला विजयासाठी २० षटकात २०२ धावांची गरज आहे. पाकिस्तान संघाने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शेहजाद अहमद (५२), शाहिद आफ्रिदी(४९) आणि माहमद्द हाफिज (६४) यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज सुरवात केली. शाहिद आफ्रिदीने १९ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकाराच्या मदतीने ४९ धावा करत पुन्हा एकदा आपली जादू दाखवली.