कुंबळेचा तो विक्रम हुकवण्यासाठी पाकिस्तानने रचले होते कारस्थान!
By admin | Published: February 8, 2017 01:51 PM2017-02-08T13:51:14+5:302017-02-08T13:51:14+5:30
अनिल कुंबळेने 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत एका डावात सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना बाद करत अनोखा विक्रम नोंदवला होता. पण हा विक्रम होऊ न देण्यासाठी
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत एका डावात सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना बाद करत अनोखा विक्रम नोंदवला होता. पण हा विक्रम होऊ न देण्यासाठी कुटील पाकिस्तानी खेळाडूंनी कारस्थान रचले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती समोर आणली आहे.
कुंबळेचा परफेक्ट 10 चा विक्रम व्हावा, यासाठी जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद आपल्याला बळी मिळू नये म्हणून बेतानेच गोलंदाजी करत होते. पण पाकिस्तानी खेळाडू मात्र तो विक्रम हुकवण्यासाठी विचार करत होते. कुंबळेच्या विक्रमाला 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलेल्या ट्विटमध्ये वासिम अक्रमने दिलेल्या माहितीचा हवाला देत वीरूने 'किस्मत के आगे सार्जिश फेल' अषा आशयाचे ट्विट केले आहे. त्यात वीरू म्हणतो, 9 फलंदाज बाद झाल्यावर वासिम अक्रम आणि वकार युनिसच्या रूपात पाकिस्तानची शेवटची जोडी मैदानात होती. त्यावेळी वकारने कुंबळेचा विक्रम हुकवण्यासाठी धावबाद होण्याचा पर्याय वासिम अक्रमला सुचवला होता. पण कुंबळेच्या नशिबात हा विक्रम असेल तर काहीही केले तरी तो विक्रम होणारच. मात्र मी कुंबळेला सहजासहजी आपली विकेट देणार नाही, असे सांगत वकारची कल्पना अक्रमने फेटाळून लावली होती. अखेरीस अक्रमचीच विकेट काढत कुंबळेने परफेक्ट १०चा विक्रम केला होता. त्या सामन्यात कुंबळेने 74 धावा देत 10 बळी टिपून जिम लेकर यांच्या डावात दहा बळी टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
Kismat ke aage ,all saazish fail.
— Virender Sehwag (@virendersehwag) February 7, 2017
Well done Wasim bhai.
What a day it was at the Kotla by Anil bhai. pic.twitter.com/xDzMd39XOq