भारताविरुद्धच्या मालिकेसाठी पाकची तयारी

By admin | Published: May 11, 2015 02:27 AM2015-05-11T02:27:58+5:302015-05-11T02:27:58+5:30

भारताविरुद्ध डिसेंबर महिन्यात युएईमध्ये मालिकेचे आयोजन करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तयारी आहे,

Pakistan ready for series against India | भारताविरुद्धच्या मालिकेसाठी पाकची तयारी

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी पाकची तयारी

Next

कोलकाता : भारताविरुद्ध डिसेंबर महिन्यात युएईमध्ये मालिकेचे आयोजन करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तयारी आहे, असे भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान क्रिकेट संबंध सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी सांगितले. या मालिकेत तीन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असेल. उभय देशांच्या क्रिकेट बोर्डांदरम्यान २०१४ मध्ये झालेल्या करारामध्ये या मालिकेचा समावेश होता. शहरयार आता हा करार पूर्ण करण्यास प्रयत्नशील आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शहरयार म्हणाले, ‘आम्ही युएईमध्ये भारत-पाक मालिका पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहोत. भारत व पाकिस्तानदरम्यान नव्याने क्रिकेटला सुरुवात होईल. ही मालिका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार डिसेंबरमध्ये होणार असून त्यात तीन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश राहील. आता आम्हाला अखेरचा अडथळा पार करावा लागणार आहे.’
प्रतिस्पर्धी क्रिकेट संघांदरम्यानची मालिका नव्याने सुरू करणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष दालमिया यांची शहरयार यांनी प्रशंसा केली. दालमिया यांच्यासोबत जुने संबंध असल्याचे शहरयार यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दालमिया यांनी उभय देशांदरम्यान क्रिकेट संबंध पुन्हा सुरू होण्याची आशा व्यक्त करताना चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला.

दालमियांचे वक्तव्य
पाकिस्तान क्रिकेटने घेतलेल्या या पुढाकाराविषयी बोलताना दालमिया म्हणाले,‘आम्हाला मालिका नव्याने सुरू होण्याची आशा आहे. काही बाबींवर तोडगा निघणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहमतीशिवाय पुढे पाऊल टाकणे कठीण आहे. गृहमंत्रालय व सरकारचा पाठिंबा मिळाल्याशिवाय आम्ही पुढचे पाऊल उचलू शकत नाही.’

Web Title: Pakistan ready for series against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.