लंकेला धूळ चारत पाकिस्तान सेमीफायनलमध्ये

By admin | Published: June 12, 2017 11:02 PM2017-06-12T23:02:57+5:302017-06-12T23:04:02+5:30

करो या मरोच्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेचा सात विकेटने पराभव करत सामीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्रफराज अहमदने कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमी अर्धशतक केले.

In the Pakistan semi-finals in the four-match series | लंकेला धूळ चारत पाकिस्तान सेमीफायनलमध्ये

लंकेला धूळ चारत पाकिस्तान सेमीफायनलमध्ये

Next

ऑनाइन लोकमत
लंडन, दि. 12 - करो या मरोच्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेचा सात विकेटने पराभव करत सामीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्रफराज अहमदने कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमी अर्धशतक केले.
पाकिस्तान नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फंलदाजीस आमंत्रीत केले होते. प्रथम फलंदाजी करताना 49. 2 षटकांत सर्वबाद 236 धावा केल्या होत्या. श्रीलंकेनं दिलेलं 237 धावांच्या लक्ष्याच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं फकर झमन आणि कर्णधार सर्फराजच्या अर्धशतकाच्या बळावर हे आव्हान तीन गाडी राखून 45 व्या षटकांत पार केलं. सामन्याच्या सुरुवातीला काहीशी ढिली झालेली पकड पाकिस्तानच्या फलंदाजांनी पुन्हा मिळवली आहे. फकर झमनने 50 धावांची महत्वपुर्ण खेळी केली. तर कर्णधार सर्फराजने 57 धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर फार मोकळीक मिळाली नाही. अखेर श्रीलंकेला 49.2 षटकांत सर्व बाद 236 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. धनुष्का गुणतिलकाच्या (13) रूपात त्यांना पहिला धक्का बसला. मात्र चिवट अर्धशतकी खेळी करणाऱ्या निरोशन डिकवेलाने कुशल मेंडिससोबत (27) 56 आणि अँजेलो मॅथ्यूजसोबत 78 धावांची भागीदारी करत लंकेला 3 बाद 161 असे सुस्थितीत नेले. पण मॅथ्यूज (39) आणि डिकवेला (73) बाद झाल्यावर श्रीलंकेडा डाव गडगडला. धनंजय डिसिल्व्हा (1) आणि थिसारा परेरा हेही बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था 7 बाद 167 असी झाली होती. अशा परिस्थितीत तळाच्या सुरंगा लकमल (26), धनुष गुणरत्ने ( 27 ) आणि यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानकडून हसन अली आणि जुनैद खान यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद आमीर आणि फहिमने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Web Title: In the Pakistan semi-finals in the four-match series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.