पाक संघ भारतात जाणार नाही : सेठी

By admin | Published: January 17, 2016 03:04 AM2016-01-17T03:04:57+5:302016-01-17T03:04:57+5:30

भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही

Pakistan will not go to India: Sethi | पाक संघ भारतात जाणार नाही : सेठी

पाक संघ भारतात जाणार नाही : सेठी

Next

कराची : भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्याऐवजी ताणले जात आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नजम सेठी यांनी, २०१७मध्ये आपला संघ भारताचा दौरा करणार नाही, असे वक्तव्य करून ‘आगीत तेल ओतण्याचे’ काम केले आहे.
सेठी म्हणाले, ‘‘बीसीसीआयने आधी आपल्या वाट्याला आलेली मालिका आयोजित करावी. त्यानंतरच आम्ही भारत दौऱ्याचा विचार करू. भारताला डिसेंबरमध्ये मालिका खेळायची होती, पण त्यांनी करारानुसार मालिका आयोजनाचे धाडस दाखविले नाही. भारताने स्वत:चे उत्तरदायित्व सिद्ध करायला हवे. भारतीय संघ आमच्यासोबत संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका किंवा कुठल्याही तटस्थ स्थळी खेळू शकतो. पण या तटस्थ ठिकाणी खेळण्यावर परस्पर सहमती तरी किमान आवश्यक आहे.’’ भारत-पाकने २०१४मध्ये एका करारानुसार दोन्ही देशांत २०१५ ते २०२३ या काळात सहा द्विपक्षीय मालिकांचे आयोजन व्हायचे असून, पहिली मालिका पाकिस्तानात खेळली जाणार होती. भारताने मालिका टाळली. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी नुकतीच भारत-पाक मालिका आयोजनाची शक्यता फेटाळून लावली. सेठी म्हणाले की, उभय देशांचे सरकार तयार असेल तर मालिका होऊ शकेल. पण त्यासाठी खेळण्याची इच्छा असणे गरजेचे आहे.’’

आम्ही कुठल्याही तटस्थ ठिकाणी खेळण्यास तयार आहोत. केवळ चांगला महसूल मिळण्याची अट आहे. २०१२मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास पाक संघ गेला होता, पण महसुलाचा वाटा आम्हाला मिळालेला नाही. जोवर भारतीय संघ आमच्या यजमानपदाखाली मालिका खेळत नाही तोवर २०१७चा भारत दौरा करण्याचे कारण नाही.
- नजम सेठी

Web Title: Pakistan will not go to India: Sethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.