पाकिस्तान विजयी

By Admin | Published: June 9, 2017 04:09 AM2017-06-09T04:09:24+5:302017-06-09T04:09:24+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पावसाचा फटका बसलेल्या लढतीत ‘ब’ गटात द. आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमानुसार १९ धावांनी पराभव करीत उपांत्यफेरीच्या आशा जिवंत ठेवल्या

Pakistan won | पाकिस्तान विजयी

पाकिस्तान विजयी

googlenewsNext

बर्मिंघम : पाकिस्तानने गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पावसाचा फटका बसलेल्या लढतीत ‘ब’ गटात द. आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमानुसार १९ धावांनी पराभव करीत उपांत्यफेरीच्या आशा जिवंत ठेवल्या.
भारताकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर पाकच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत द. आफ्रिकेला ८ बाद २१९ धावांवर रोखले. पाकने पावसाने हजेरी लावेपर्यंत २७ षटकांत ३ बाद ११९ अशी वाटचाल केली होती. पावसामुळे पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही.
त्यावेळी पाक संघ डकवर्थ- लुईस नियमानुसार १९ धावांनी पुढे होता. पाककडून फाखर झमा याने नाबाद ३१ आणि मोहम्मद हफिजने २६ धावा केल्या.
पाकच्या फिरकी गोलंदाजांनी सुरुवातीचे दोन गडी बाद केल्यानंतर वेगवान गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना वेसण घातली. डेव्हिड मिलरने (नाबाद ७५) आणि ख्रिस मॉरिससोबत (२८) सातव्या गड्यासाठी ४७आणि कासिगो रबाडासोबत(२६) आठव्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी करीत २०० चा आकडा गाठून दिला.
वन डे क्रिकेटमधील मिलरची ही सर्वात मंद अर्धशतकी खेळी होती. ७५ धावांत त्याने केवळ चारच चौकार मारले. आफ्रिकेने एकवेळ ११८ धावांत सहा गडी गमावले होते. पाककडून डावखुरा ुिफरकीपटू इमादने दोन आणि अझहर अलीने तीन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
>स्थानिक प्रेक्षकांमुळे जिंकलो: सरफराज
बर्मिंघम : द. आफ्रिकेवर सनसनाटी विजय मिळविल्याचे श्रेय पाकचा कर्णधार सरफराज अहमद याने स्थानिक चाहत्यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकने नंबर वन द. आफ्रिकेला नमविले हे विशेष. स्टेडियममध्ये उपस्थित १६ हजरांवर प्रेक्षकांत पाकिस्तानच्या चाहत्यांचे वर्चस्व होते. बर्मिंघममध्ये सर्वाधिक आशियाई नागरिकांचे वास्तव्य असल्याने पाक संघाला घरच्यासारखे वाटत होते. प्रेक्षकांच्या समर्थनामुळे आमच्या खेळाडूंचे मनोबळ उंचावले. यामुळे सामना जिंकण्यास मदत मिळाली, असे सरफराजने सांगितले.

Web Title: Pakistan won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.