पाकिस्तानी गोलंदाज म्हणतोय, विराटला सहज बाद करेन
By admin | Published: May 28, 2017 11:20 AM2017-05-28T11:20:11+5:302017-05-28T11:20:11+5:30
चार तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. पण त्यापूर्वीच स्लेजिंगला सुरुवात झाल्याचे दिसतेय. पाकिस्तानी खेळाडूने भारतीय कर्णधार विराटला टार्गेट करत वातावरण गरम केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - चार तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. पण त्यापूर्वीच स्लेजिंगला सुरुवात झाल्याचे दिसतेय. पाकिस्तानी खेळाडूने भारतीय कर्णधार विराटला टार्गेट करत वातावरण गरम केले आहे. एकीकडे विराटने पाकिस्तानी संघाला जास्त भाव न देता इतर संघाप्रमाणे लेखले असताना पाक संघातील खेळाडू मात्र त्याला टार्गेट करत असल्याचे दिसतेय.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह आता विराटला डिवचले आहे पाक संघातील खेळाडूने. पाकिस्तानचा तेज गोलंदाज जुनेद खान याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिकोनातून ही सुरुवात केली आहे. किस्तान मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, रताचा कर्णधार विराट कोहली तल्लख फलंदाज आहे; पण माझ्यापुढे त्याची डाळ शिजत नाही. अर्थात याला कारणही तसे आहे; कारण डावखुऱ्या जुनेदने चारपैकी तीनवेळा कोहलीची विकेट काढली आहे. हलीच्या हक्काच्या घरच्या प्रेक्षकांपुढे मी त्याच्या दांड्या गुल केल्या होत्या. मग इंग्लंडमध्ये मला त्याची विकेट अगदी सहज मिळेल, असे जुनेद म्हणाला.
विराटला डिवचणाऱ्या जुनेदला काल झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. हे आवर्जून नमूद करावे लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात जुनेदच्या नऊ षटकांमध्ये 73 धावा तडकावण्यात आल्या.
कोहलीने जुनेदचा सामना करून चार वर्षांचा कालावधी लोटला आहे; पण तरीदेखील 4 जूनच्या सामन्यात आपलाच वरचष्मा असेल, असे जुनेद ठणकावून सांगतो. मी कोहलीला बऱ्याचदा बाद केल्याने तो आताही माझ्यापासून बिचकूनच राहील. माझ्याविरुद्ध सावध पवित्रा घेतल्याने तो सहज विकेट गमावून बसेल, असे जुनेदचे म्हणणे आहे. 27 वर्षांच्या जुनेदच्या मते कोहलीच काय; पण भारताच्या फलंदाजांना त्याच्या चेंडूंवर चौकार मारता आलेला नाही. ही बाब त्याला अभिमानास्पद वाटते. कोहली व त्याच्या सहकाऱ्यांनी जगातील मैदानांवर सहज फटकेबाजी केली आहे. गोलंदाजांसाठी ते दुःखद स्वप्न ठरतात; पण माझ्याविरुद्ध त्यांना चौकार वसूल करता आलेला नाही. हा मी माझा मान समजतो.