Tokyo Olympic : पाकिस्तानात ऑलिम्पिकपटू घडवण्यासाठी क्रिकेटपटू निधी गोळा करणार, खेळाडूंची अवस्था पाहून व्यथित!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 10:54 PM2021-07-25T22:54:37+5:302021-07-25T23:05:19+5:30

Tokyo Olympic स्पर्धेत भारताचे 119 खेळाडू सहभागी झाले आहेत, तेच दुसरीकडे पाकिस्तानचे फक्त 10 खेळाडू या मेगा क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

pakistani cricketer Shadab Khan pledge to set up a fund for Pakistan’s Olympic’s athletes in preparation for the next Olympics | Tokyo Olympic : पाकिस्तानात ऑलिम्पिकपटू घडवण्यासाठी क्रिकेटपटू निधी गोळा करणार, खेळाडूंची अवस्था पाहून व्यथित!

Tokyo Olympic : पाकिस्तानात ऑलिम्पिकपटू घडवण्यासाठी क्रिकेटपटू निधी गोळा करणार, खेळाडूंची अवस्था पाहून व्यथित!

Next

Tokyo Olympic स्पर्धेत भारताचे 119 खेळाडू सहभागी झाले आहेत, तेच दुसरीकडे पाकिस्तानचे फक्त 10 खेळाडू या मेगा क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू इमरान नझीरनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता शादाब खाननं पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आतापासून निधी गोळा करण्याचा संकल्प केला आहे. त्यानं सोशल मीडियावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी निधी गोळा करण्याचा निर्धार सोशल मीडियावर व्यक्त केला. त्यानं यावेळी पाकिस्तानातील जनतेलाही पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. ( pakistani cricketer Shadab Khan pledge to set up a fund for Pakistan’s Olympic’s athletes in preparation for the next Olympics)


२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या २१ खेळाडूंचा सहभाग होता. १९५६ मध्ये संपन्न झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ६२ खेळाडू सहभागी झाले होते. पाकिस्तानला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये १० पदकं मिळाली आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. १९९२ नंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळालेलं नाही. 

त्यानं यावेळी वेटलिफ्टर तल्हा तालीब याचे कौतुक केलं. अशा खेळाडूंना योग्य स्पॉन्सर मिळायला हवेत असेही त्यानं आवाहन केलं. 

शादाबने 6 कसोटींत 300 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय 48 वन डेत 434 धावा व 62 विकेट्स आणि 49 ट्वेंटी-20त 221 धावा व 58 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
 

Web Title: pakistani cricketer Shadab Khan pledge to set up a fund for Pakistan’s Olympic’s athletes in preparation for the next Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.