पाकिस्तानच्या फिल्डींग कोचचा राजीनामा
By admin | Published: February 18, 2015 02:58 PM2015-02-18T14:58:30+5:302015-02-18T15:08:45+5:30
पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे मैदानावरील बेशिस्त वर्तन सुरुच असून सरावा दरम्यान क्रिकेटपटूंनी असभ्य वर्तन केल्याने पाकचे फिल्डींग कोच ग्रँट ल्यूडेन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अॅडिलेड, दि. १८- पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे मैदानावरील बेशिस्त वर्तन सुरुच असून सरावा दरम्यान क्रिकेटपटूंनी असभ्य वर्तन केल्याने पाकचे फिल्डींग कोच ग्रँट ल्यूडेन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. वर्ल्डकप सुरु असतानाच प्रशिक्षकाने राजीनामा दिल्याने पाक संघाला हादरा बसला असून पाक बोर्डाने या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्याचे पाकचे ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि संघातील ज्येष्ठ खेळाडूंचे असहकार्य यामुळे ग्रँट ल्यूडेन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे राजीनामा पाठवल्याचे वृत्त आहे. भारतविरुद्धचा सामना झाल्यावर पाकिस्तान संघ सराव करत होता. सरावा दरम्यान शाहिद आफ्रिदी, उमर अकमल आणि अहमद शहजाद या तिघांनी ल्यूडन यांच्याशी असभ्य वर्तन केले. वरिष्ठ खेळाडूंच्या या वर्तनामुळे ल्यूडन चांगलेच संतापले. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिल्याचे समजते. ल्यूडन यांच्या तक्रारीनंतर पाक बोर्डाच्या अध्यक्षाचे पाकिस्तान संघाच्या टीम मॅनेजरला खेळाडू व ल्यूडनमधील वादावर तोडगा काढायला सांगितला आहे.