पाकचा निम्मा संघ तंबूत

By admin | Published: February 15, 2015 12:56 PM2015-02-15T12:56:24+5:302015-02-15T15:40:24+5:30

वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-यामुळे पाकिस्तानचा निम्मा संघ अवघ्या १३४ धावांमध्येच तंबूत परतला आहे.

Pakistan's Half of Team Tents | पाकचा निम्मा संघ तंबूत

पाकचा निम्मा संघ तंबूत

Next

 ऑनलाइन लोकमत 

अॅडिलेड, दि. १५ - वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-यामुळे पाकिस्तानचा निम्मा संघ अवघ्या १३४ धावांमध्येच तंबूत परतला आहे. उमेश यादवचा भेदक मारा व आर. अश्विनची फिरकीमुळे यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली आहे. 

वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत सुरु आहे. भारताच्या ३०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकला भारताने सुरुवातीलाच धक्का दिला. सलामीवीर युनूस खान सहा धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीच्या बाऊन्सरवर युनूस बाद झाला. यानंतर अहमद शहजाद आणि हॅरिस सोहेल या जोडीने पाकचा पुढे नेला. मात्र आर. अश्विनच्या फिरकीने हॅरिस सोहेलची विकेट घेतली. यानंतर उमेश यादवच्या भेदक मा-याने सोहेब मकसूद व शहजादची विकेट घेत पाकची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली. रविंद्र जडेजाच्या चेंडूवर उमर अकमल बाद झाला. अकलमच्या बॅटला लागून चेंडू धोनीकडे गेला होता. पंचांनी नाबादचा निर्णय दिल्यावर धोनीने डीआरएस प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय दिला. यानंतर अकमलला बाद ठरवण्यात आले. पाकची अवस्था ५ बाद १०३ अशी झाली आङे. सध्या खेळपट्टीवर मिसबाह उल हक आणि शाहिद आफ्रिदी ही जोडी मैदानात असून भारताला विजयासाठी आणखी ५ विकेटची गरज आहे. 

दरम्यान, नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. भारताच्या २४ धावा झाल्या असताना भारताची सलामीची जोडी फोडण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताचा डाव पुढे नेला. धवन - कोहली जोडीने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी धावा करत भारताचा फलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावताच या दोघांनीही फटकेबाजीला सुरुवात केली. शिखर धवन ७३ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. धवन - कोहली जोडीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर विराट कोहलीने रैनाच्या मदतीने भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. कोहलीच्या शतकानंतर सुरेश रैनानेही अर्धशतक ठोकले.  कोहली १०८ आणि रैना ७२ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ४७.३ षटकांत  ४ बाद २८४ अशी होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अचूक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८, रविंद्र जडेजा ३ आणि अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच माघारी परतला. लागोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावाच केल्या. शेवटच्या पाच षटकांत भारताने फक्त २७ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सोहेल खानने १० षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. तर वहाब रियाजने एक विकेट घेतली.

Web Title: Pakistan's Half of Team Tents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.