पाकिस्तानचा सहभाग अधांतरी

By admin | Published: October 9, 2016 04:53 AM2016-10-09T04:53:35+5:302016-10-09T04:53:35+5:30

भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर लखनौ येथे डिसेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या ज्युनिअर हॉकी विश्वचषकात पाकचा संघ सहभागी होणार

Pakistan's interim declaration | पाकिस्तानचा सहभाग अधांतरी

पाकिस्तानचा सहभाग अधांतरी

Next

कराची : भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर लखनौ येथे डिसेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या ज्युनिअर हॉकी विश्वचषकात पाकचा संघ सहभागी होणार किंवा नाही, याचा निर्णय सरकारच्या परवानगीवर विसंबून असल्याचे पाक हॉकी महासंघाचे महासचिव शाहबाज अहमद यांनी सांगितले.
पाक हॉकी महासंघाने सरकारकडे पाक संघाच्या सहभागाविषयी परवानगी मागितली आहे. विनंतीवर अद्याप उत्तर आलेले नाही. सरकारकडून हिरवी झेंडी मिळताच आमचा संघ भारतात दाखल होईल, असे अहमद यांनी स्पष्ट केले. उभय देशांत सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाक स्पोर्ट्स बोर्डाकडे स्पर्धेत सहभागी होऊ देण्याची विनंती केली असली, तरी ज्युनिअर विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेस आमचे खेळाडू मुकतील, अशी भीती आहे. आम्हाला परवानगी मिळेलच, असे नाही. सरकारने ठरविले, तरच लखनौमध्ये दाखल होऊ. ऊरी हल्ल्यानंतर उभय देशांत राजकीय आणि सैनिकी वातावरण तापले आहे. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषकात सहभागी होण्यास पाक कबड्डी संघाला नकार देण्यात आला. आमच्या सर्व
आशा पाकिस्तान सरकारच्या भूमिकेवर विसंबून असल्याचे राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी कर्णधार शाहबाज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan's interim declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.