पालघरच्या ईशा जाधवने चौथ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जिंकले रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 09:16 AM2022-10-18T09:16:33+5:302022-10-18T09:17:12+5:30

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ईशा जाधवने रौप्य पदक जिंकले.  

Palghar's Isha Jadhav wins silver in 4th Asian Athletics Championships in 400 meter race u 18 girls categary | पालघरच्या ईशा जाधवने चौथ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जिंकले रौप्यपदक

पालघरच्या ईशा जाधवने चौथ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जिंकले रौप्यपदक

Next

कुवैत येथे झालेल्या चौथ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मुलींच्या १८ वर्षांखालील वयोगटात पालघरच्या ईशा जाधवने ४०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले.  

ईशा जाधव ही अमेय क्लासिक क्लब (फ्लाय) इथे नियमित सराव करते.  तिचे क्रीडा प्रशिक्षक श्री. संदीप लटवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन  ईशा ला मिळाले. अमेय क्लासिक क्लब कडून तिला वेळोवेळी प्रोत्साहन मिळते. प्रथम महापौर श्री. राजीव पाटील व अमेय क्लासिक क्लब च्या संचालिका श्रीम. ग्रीष्मा पाटील ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन नियमित लाभत असते. त्यांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिने मिळविलेल्या प्रविण्या बद्दल संपूर्ण  महाराष्ट्रातून  व पालघर जिल्ह्यातून तिचे कौतुक होत आहे.

 

Web Title: Palghar's Isha Jadhav wins silver in 4th Asian Athletics Championships in 400 meter race u 18 girls categary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.