आडवाणीने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 05:01 AM2019-06-23T05:01:24+5:302019-06-23T05:01:47+5:30
भारताचा स्टार खेळाडू पंकज आडवाणी याने ३५ व्या पुरुष आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप जिंकताना क्यू खेळांच्या त्याच्या कारकीर्दीतील त्याचे ग्रँडस्लॅम पूर्ण केले.
दोहा - भारताचा स्टार खेळाडू पंकज आडवाणी याने ३५ व्या पुरुष आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप जिंकताना क्यू खेळांच्या त्याच्या कारकीर्दीतील त्याचे ग्रँडस्लॅम पूर्ण केले.
शुक्रवारी मिळालेल्या विजयाबरोबरच आडवाणीने एससीबीएस आशियाई स्नूकर स्पर्धा- ६ रेड (छोटे स्वरूप) आणि १५ रेड (मोठे स्वरूप) या दोन्ही स्वरूपात आयबीएसएफ विश्व चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली आहे.
बिलियर्ड्समध्ये ही उपलब्धी प्राप्त केलेल्या आडवाणीच्या यशात फक्त १५ रेड आशियाई स्नूकर स्पर्धेतील विजेतेपदाची उणीव होती ती
त्याने आज फायनलमध्ये थानावत तिरापोंगपाईबून याचा ६-३ असा पराभव करीत भरून काढली केली, अशा
प्रकारे आडवाणी सर्वच स्वरूपांत आशियाई आणि विश्व चॅम्पियनशिप आपल्या नावावर करणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे.
आडवाणी याने आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर १0-१५, १-९७, ११0-१, ६९-४३, ७१-४४, ८0-४९, ७२-४२, ६७-१ अशी मात करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आता तो पुढील आठवड्यात आयबीएसएफ विश्वचषकात सहभागी होणार आहे.
या विजेतेपदाने मी माझ्या देशाचे दोन्ही खेळात प्रतिनिधित्व करताना सर्वकाही प्राप्त केले आहे. या विजयाने माझी ट्रॉफीची कॅबिनेट पूर्ण झाली आहे.
- पंकज आडवाणी