पंकज अडवाणीला विश्वविजेतेपद
By admin | Published: October 26, 2014 01:28 AM2014-10-26T01:28:57+5:302014-10-26T01:28:57+5:30
भारताच्या पंकज अडवाणी याने विश्व विलियर्ड्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंगापूरच्या पीटर गिलािस्टला धूळ चारून विजेतेपदाचा मान मिळविला़
Next
लीड्स : भारताच्या पंकज अडवाणी याने विश्व विलियर्ड्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंगापूरच्या पीटर गिलािस्टला धूळ चारून विजेतेपदाचा मान मिळविला़
अडवाणी याने माजी चॅम्पियन गिलख्रिस्टला फायनलमध्ये 6-2 ने मात करीत अकराव्यांदा विश्वविजेतेपद आपल्या नावे करण्यात यश मिळविल़े
पंकजने अंतिम फेरीत 23-151, 151-16, 116-15क्, 151-1क्4, 15क्-क्, 151-58, 15क्-4, 15क्-145 अशी बाजी मारली़ या लढतीत गिलािस्टने तिस:या फ्रेमदरम्यान 2-1 अशी आघाडी मिळविली होती़ मात्र, यानंतर अडवाणी याने जबरदस्त खेळ करीत 3-2 ने आघाडी मिळविली़ यानंतर त्याने मागे वळून न बघता अजिंक्यपदावर आपले नाव कोरल़े जेतेपद मिळविल्यानंतर पंकज अडवाणी म्हणाला की, स्पर्धेपूर्वी अजिंक्यपदाचे लक्ष्य ठेवले होत़े त्यात यश मिळाले याचा आनंद आह़े गिलािस्ट या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होता़ त्याच्यावर मात करता आली याचेही समाधान असल्याचे पंकज याने सांगितल़े (वृत्तसंस्था)