पंतने मने जिंकली

By admin | Published: May 5, 2017 03:20 AM2017-05-05T03:20:02+5:302017-05-05T03:20:02+5:30

कर्णधार करुण नायर बाद झाल्यावर दिल्लीकर दडपणाखाली आले. मात्र युवा ऋषभ पंतने तुफानी फटकेबाजी केली आणि

Pantner won the Man | पंतने मने जिंकली

पंतने मने जिंकली

Next

आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमत
नवी दिल्ली दि. 5 -  रैना, कार्तिक सारख्या दिग्गजांचा शो संपला, दोघांनी तुफानी खेळी करत गुजरात लायन्सला २०८ ही टी २० तील डोंगराएवढी धावसंख्या उभारून दिली. आता दिल्लीच्या नवख्या खेळाडूंचे त्यांच्यासमोर पानिपत होणार अशी स्थिती होती. त्यातच कर्णधार करुण नायर बाद झाल्यावर दिल्लीकर दडपणाखाली आले. मात्र युवा ऋषभ पंतने तुफानी फटकेबाजी केली आणि ही धावसंख्याही छोटी करून दाखवली. दिल्लीने आतापर्यंत पाठलाग करून विजय मिळवलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. क्रिकेट विश्वात ऋषभ पंतची तुलना धोनीसोबत केली जाते ते उगाचच नाही हे त्याने आजच्या खेळीने दाखवून दिले. शतक पूर्ण करण्यास फक्त तीन धावा शिल्लक असताना तो बाद झाला. बसील थम्पीने त्याला बाद केले. मात्र तो बाद झाल्यावर लायन्सचा कर्णधार सुुरेश रैना याने थम्पीचे अभिनंदन करण्याऐवजी आधी पंतचे कौतुक केले. त्यातच त्याची आजची खेळी किती मोठी हे दिसून येते. पंतच्या या खेळीने रैना, कार्तिक यांच्या तुफानी खेळींचे महत्त्व आपोआपच कमी केले.
गुजरातच्या गोलंदाजीचा विचार केला तर ही गोलंदाजी अगदीच सुमार दर्जाची नाही. त्यांच्याकडे रविंद्र जाडेजा, जेम्स फॉकनर यांच्यासारखे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. मात्र त्यांच्या गोलंदाजीचा समाचार त्याने घेतला. त्याने फॉकनरला तीन आणि जाडेजाला एक षटकार लगावला. या सामन्यात पंतने तब्बल ९ षटकार लगावले. त्यासोबतच तो सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या
खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याने १० सामन्यात १७ षटकार लगावले आहेत. त्यासोबतच पंतची समर्थ साथ संजू सॅमसन याने दिली. पंतसोबतच दुसऱ्या बाजुने त्याने जोशात आक्रमण केले. चौकार आणि षटकारांची बरसात केली. त्याने ३१
चेंडूतच ६७ धावा केल्या. त्याने देखील रैना, जाडेजा, फॉकनर , संगवान यांची धुलाई केली. या सामन्यात क्षेत्ररक्षकांपेक्षा जास्त वेळा चेंडू स्टॅण्डमधील प्रेक्षकांच्याच हाती पोहचला.
गुजरातचा कर्णधार सुरेश रैना याने या सामन्यात जाडेजाला दहाव्या षटकानंतर गोलंदाजी देण्याचा निर्णय का घेतला हे कोड्यात टाकणारे आहे. समोरुन तुफानी आक्रमण होत असताना रैनाने जागतीक क्रमावारीत अव्वल स्थानांवर असणाऱ्या जाडेजाला गोलंदाजी देण्याएवजी पार्टटाईम गोलंदाज असून स्वत: दोन षटके टाकली. त्या षटकांत त्याने २४ धावा दिल्या. त्याचा मोठा फटका
गुजरातला बसला. दोन्ही फलंदाजांनी चांगलाच जम बसवल्यावर त्याने गोलंदाजीसाठी जाडेजाला पाचारण केले. जाडेजानेही त्याला निराश केले नाही. त्याने सॅमसनला तंबूत परत पाठवले. मात्र तो पर्यंत उशीर झाला. दिल्लीने धावफलकावर १६७चा आकडा गाठला होता. बसील थम्पीने पंतला बाद केले. कोरी अँडरसन आणि श्रेयस अय्यर यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
दिल्लीच्या संजू आणि ऋषभ या दोन्ही खेळाडूंनी अव्वल दहात स्थान मिळवले. संजू सॅमसने आॅरेंज कॅपच्या शर्यतीत पाचवे स्थान गाठले आहे. त्याने १० सामन्यात ३७४ धावा केल्या. तर ऋषभने १० सामन्यात २० षटकार ठोकले. या यादीत त्याने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्याच्या पुढे फक्त उथप्पा (२१) आणि डेव्हिड वॉर्नर(२३) हे आहेत.

या सामन्यातील विजयासोबतच दिल्लीने आपल्या प्ले आॅफच्या आशा कायम राखल्या आहेत. दहा सामन्यात चार विजयांसह दिल्ली सहाव्या स्थानावर आहे. प्ले आॅफसाठी त्यांना उर्वरीत चारही सामने जिंकणे गरजेचे ठरणार आहे. त्यासोबतच आपला नेट रनरेटही वाढवावा लागेल.

 

Web Title: Pantner won the Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.