इंग्लंडवर बेट लावणाऱ्या पंटर्सनी गमावले 2000 कोटी रुपये
By admin | Published: April 4, 2016 03:08 PM2016-04-04T15:08:18+5:302016-04-04T15:08:18+5:30
ख्रिस गेलसह तीन विकेट झटपट गेल्यानंतर इंग्लंडच्या बाजुने पैसे लावणाऱ्याच्या तोंडचं पाणि वेस्टइंडिजने पळवलं असून तब्बल 2000 कोटी रुपयांचा फटका पंटर्सना बसला
Next
>डिप्पी वांकाणी
मुंबई, दि. 4 - ख्रिस गेलसह तीन विकेट झटपट गेल्यानंतर इंग्लंडच्या बाजुने पैसे लावणाऱ्यांच्या तोंडचं पाणी वेस्टइंडिजने पळवलं असून तब्बल 2000 कोटी रुपयांचा फटका पंटर्सना बसला आहे. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही वेस्टइंडिजवर पैसे लावले त्यांना मात्र करोडोंची लॉटरीच लागली.
बेटिंग विश्वातल्या बुकिजनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्डकपमध्ये तब्बल 25 हजार कोटींचं बेटिंग झालं. विश्वचषकातला अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी, मध्यंतरात, वेस्टइंडिजची प्रत्येक विकेट जाताना, आणि शेवटच्या षटकातल्या प्रत्येक सिक्सनंतर बुकीज रेट बदलत होते.
सामना सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज हा बुकींचा फेवरेट संघ होता. मध्यंतरापर्यंत वेस्टइंडिजवरच बुकीजनी पैसे लावले होते. मात्र, पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर 19 व्या ओव्हरपर्यंत इंग्लंडचा संघ शिरजोर होता आणि या संघावरच तुफान पैसे लागले होते. मात्र, ब्रेथवेटने शेवटच्या षटकात 19 धावा जिंकायला हव्या असताना स्टोक्सला सलग चार षटकार लगावले आणि केवळ वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला नाही, तर वेस्ट इंडिजवर पैसे लावणाऱ्यांनाही करोडो रुपये मिळवून दिले. ज्यांनी इंग्लंडवर पैसे लावले त्यांनी मात्र सुमारे 2000 कोटी रुपये गमावले, असे एका मुंबईस्थित बुकीने सांगितले.
बुकींच्या सांगण्यानुसार www.betfair.com आणि www.bet365.com यासारख्या वेबसाइट्सच्या माध्यमातून बुकिंग स्वीकारण्यात आलं आणि देशातले आघाडीचे बुकी जयपूर आणि कोलकात्यातून व्यवहार करत होते. ज्या पंटर्सनी कालच्या सामन्यात पैसे गमावले आहेत, ते आता झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आयपीएलची वाट पहात आहेत.
या सामन्यासाठी लागलेले बेटिंगचे दर पुढीलप्रमाणे:
सामना सुरू होण्यापूर्वी
वेस्ट इंडिज -1 रुपयाला 85 पैसे
इंग्लंड -1 रुपयाला 1 रुपया 15 पैसे
(म्हणजे वेस्टइंडिजवर 1 रुपया लावला आणि वेस्ट इंडिज जिंकली तर 1 रुपया 85 पैसे मिळतिल, इंग्लंडवर पैज लावली आणि इंग्लंड जिंकला तर 2 रुपये 15 पैसे मिळणार. पैज लावलेला संघ हरला तर पंटर 1 रुपया हरणार)
मध्यंतरात
वेस्ट इंडिज -1 रुपयाला 36 पैसे
इंग्लंड -1 रुपयाला 2 रुपये 50 पैसे
वेस्ट इंडिजची पहिली विकेट गेल्यानंतर
वेस्ट इंडिज - 1 रुपयाला 55 पैसे
इंग्लंड - 1 रुपयाला 1 रुपया 65 पैसे
ख्रिस गेल बाद झाल्यानंतर
वेस्ट इंडिज - 1 रुपयाला 1 रुपया
इंग्लंड - 1 रुपयाला 90 पैसे
शेवटच्या ओव्हरपूर्वी
वेस्ट इंडिज - 1 रुपयाला 5 रुपये
इंग्लंड -1 रुपयाला 16 पैसे
ब्रेथवेटने शेवटच्या षटकात पहिली सिक्स मारल्यावर
वेस्ट इंडिज - 1 रुपयाला 2 रुपये
इंग्लंड - 1 रुपयाला 40 पैसे
ब्रेथवेटने शेवटच्या षटकात दुसरी सिक्स मारल्यावर
वेस्ट इंडिज - 1 रुपयाला 10 पैसे
इंग्लंड - 1 रुपयाला 10 रुपये