पॅरा जलतरणपटूला विदेशात उधार घ्यावी लागली रक्कम, अडचणींवर मात करत बर्लिनमध्ये जिंकले रौप्य

By admin | Published: July 12, 2017 10:41 PM2017-07-12T22:41:19+5:302017-07-12T22:41:19+5:30

शासन मदतीची घोषणा करते, पण ही मदत वेळेवर मिळेलच याची खात्री नसते. स्थानिक पॅरा जलतरणपटू कांचनमाला पांडे हिला

Para swimmers need to borrow money abroad, silver won in Berlin by overcoming problems | पॅरा जलतरणपटूला विदेशात उधार घ्यावी लागली रक्कम, अडचणींवर मात करत बर्लिनमध्ये जिंकले रौप्य

पॅरा जलतरणपटूला विदेशात उधार घ्यावी लागली रक्कम, अडचणींवर मात करत बर्लिनमध्ये जिंकले रौप्य

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 12 - शासन मदतीची घोषणा करते, पण ही मदत वेळेवर मिळेलच याची खात्री नसते. स्थानिक पॅरा जलतरणपटू कांचनमाला पांडे हिला अशाच एका घोषणेचा फटका बसला. वेळेत आर्थिक मदत न मिळाल्याने बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेसाठी गेलेल्या या नेत्रहीन खेळाडूवर  विदेशात दुस-यांपुढे हात पसरण्याची वेळ आली.

अशाही स्थितीत अनेक अडचणींवर मात करीत कांचनमालाने शंभर मीटर फ्री स्टाईल (१.३४:००), बॅक स्ट्रोक  (१.४१:००), ब्रेस्ट स्ट्रोक (२.०१:००), या प्रकारात पात्रता गाठली तर २०० मीटर वैयक्तिक मिडले (३.३:००) प्रकारात देदीप्यमान कामगिरी करीत रौप्य पदक जिंकले. यंदा विश्व पॅरा जलतरण स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारताची ती एकमेव खेळाडू होती. कांचनमाला या स्पर्धेत मदतनीसासोबत सहभागी झाली होती. सरकारकडून तिला पुरस्कृत रक्कम जाहीर झाली पण पॅरा आॅलिम्पिक कमिटीचे खाते सध्या गोठविण्यात (पीसीआयने) आल्यामुळे ही रक्कम मिळवून देण्यात दिरंगाई झाली. परिणामी  निवास आणि भोजनाचा खर्च कांचनमालाला स्वत: करावा लागला. रिझर्व्ह बँकेच्या नागपूर शाखेत कार्यरत असलेली कांचनमाला मूळची अमरावतीची. जलतरणात अनेक स्पर्धा गाजविल्याने बँकेत नोकरी मिळाली. ‘लोकमत’ला आपबिती सांगताना कांचनमाला म्हणाली,‘असा प्रसंग वाट्याला येईल, असे कधीही वाटले नव्हते. प्रायोजन रक्कम न मिळाल्याने कर्ज काढून स्पर्धेला गेले. मी विश्व स्पर्धेसाठी पात्र ठरले, हे माहीत असताना पीसीआयने महत्त्व का दिले नाही, हे देखील कोडे आहे.’
 
पीसीआयने जलतरणपटूंच्या मदतीला कंवलजीतसिंग नावाचे कोच दिले होते. मुख्य स्पर्धेच्यावेळी हे कोच स्पर्धास्थळी दिसलेच नाही. त्यांची कुठलीही मदत मिळत नाही, हे ध्यानात येताच मी स्पर्धास्थळाहून हॉटेलकडे परत आले तेव्हा पैसे नव्हतेच. विनातिकीट ट्राममध्ये चढल्याचा फटका बसला तो वेगळाच. विनातिकीट प्रवास केल्याबद्दल १२० पौंडांचा (एक हजार रुपये) दंड
ठोठावण्यात आल्याची माहिती कांचनमालाने दिली. सुदैवाने सोबत असलेल्या खेळाडूकडून उधार घेत दंडाची रक्कम भरली.  खेळाडूच्या सहभागाविषयीचे शुल्क पीसीआयद्वारे भरले जाते पण कोच सिंग हे माझ्याकडून सारखे सहभाग शुल्क मागत राहिले. कोच हे खेळाडूंच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी असतात. सिंग यांच्यात यापैकी एकही सद्गुण पहायला मिळाला नसल्याची तक्रार या खेळाडूने केली.
 
‘‘मी खर्च केलेली रक्कम सरकारकडून परत मिळणार की नाही, अधिकृत माहिती मिळालेली नाही. जवळपास ७० हजार रुपये निवासावर तसेच ४० हजार रुपये जेवणावर खर्च झाले. एकवेळ अशीही आली की माझ्याजवळ छदामही उरला नव्हता. मी हतबल झाले होते. ५० मीटर बॅकस्ट्रोक हा माझा इव्हेंट नाही तरीही या प्रकारासाठी माझे नाव देण्यात आले. याबद्दल आंतरराष्टÑीय पॅरा आॅलिम्पिक समितीला पत्राद्वारे माहिती दिली आहे.’’- कांचनमाला पांडे

Web Title: Para swimmers need to borrow money abroad, silver won in Berlin by overcoming problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.