Paralympics 2020 : गोल्डन बॉय सुमित अंतिल याच्यासाठी आनंद महिंद्रांचं खास गिफ्ट; XUV 7OOची नवी Javelin edition!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 10:53 AM2021-08-31T10:53:55+5:302021-08-31T10:55:48+5:30
Paralympics 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले
Paralympics 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले, तर देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी नेमबाद अवनी हिच्यानंतर गोल्डन बॉय सुमित अंतिल याच्यासाठी खास गिफ्ट तयार करण्यास सांगितले आहे. सुमितला आनंद महिंद्रा यांनी Javelin edition of XUV 700 गिफ्ट करण्याची घोषणा केलीय.
Afghanistan Crisis: शाहिद आफ्रिदीचा धक्कादायक दावा; तालिबानी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन आलेत! Video
सोमवारी सुमित अंतिलनं पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. ( Sumit Antil throws another World Record of 68.08m in his second attempt in the Men's Javelin Throw F64 Final event). तिसऱ्या प्रयत्नात सुमितनं ६५.२७ मीटर भालाफेक केली, परंतु अन्य स्पर्धकांच्या तुलनेत त्यानं याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानं पाचव्या प्रयत्नात पुन्हा ६८.५५ मीटर लांब भालाफेकून पुन्हा स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. या कामगिरीसह त्यानं सुवर्णपदकही नावावर केलं.
आनंद महिंद्रांनी गोल्डन बॉयचे कौतुक केले. त्यांनी लिहिलं की,''अविश्वसनीय कामगिरी. त्याची ही कामगिरी XUV 700 ची हकदार आहे. भारताने ऐतिहासिक क्रीडा प्रकारात आज दोन सुवर्णपदक जिंकले.'' महिंद्रा यांनी त्यांच्या टीममधील सदस्याला सुमितसाठी Jevelin Edition XUV 700 तयार करण्यास सांगितले.
An awesome sporting feat. Without exception. His performance demands an XUV 7OO. India now has TWO Golds in this ancient sport. @BosePratap Please design another Javelin edition of the XUV 7OO that we will be privileged to gift this incredible sportsperson. 👏🏽👏🏽👏🏽 https://t.co/DA22MG1pIF
— anand mahindra (@anandmahindra) August 30, 2021
सोनेरी यश मिळवणाऱ्या अवनीवर बक्षिसांचा वर्षाव, आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट
अवनी लेखरा हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. (Tokyo Paralympics)अंतिम फेरीत तिने २४९.६ गुण मिळवत तिने जागतिक विक्रमाची बरोबरी करत अव्वलस्थान पटकावले. (Avani Lekhara) पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिलेल्या अवनीने अंतिम फेरीत मात्र जोरदार कामगिरी केली आणि सुवर्णवेध घेतला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. आनंद महिंद्रा यांनीही अवनीच्या या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून अवनीला स्पेशल गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रा आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आम्ही दिव्यांगांसाठी एसयूव्ही विकसित करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वी दीपा मलिक हिने दिला होता. मी माझे सहकारी वेलू यांना या आव्हानाचा सामना करण्यासाठी विनंती केली आहे. वेलू हे आमचे डेव्हलपमेंट हेड आहेत. असो वेलूजी तुमच्याकडून विकसित झालेली अशी पहिली एसयूव्ही #AvaniLekhara हिला समर्पित करून भेट देऊ इच्छितो.
A week ago @DeepaAthlete suggested that we develop SUV’s for those with disabilities. Like the one she uses in Tokyo.I requested my colleague Velu, who heads Development to rise to that challenge. Well, Velu, I’d like to dedicate & gift the first one you make to #AvaniLekharahttps://t.co/J6arVWxgSA
— anand mahindra (@anandmahindra) August 30, 2021