Paris Olympic 2024 : कडक सॅल्युट! नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात फायनलचे तिकीट; पाहा अविस्मरणीय क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 03:45 PM2024-08-06T15:45:21+5:302024-08-06T15:49:56+5:30

भारताच्या नीरज चोप्राची सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल.

Paris Olympic 2024 india's Neeraj Chopra ticket to finals in first attempt in javelin throw Watch here the unforgettable moment | Paris Olympic 2024 : कडक सॅल्युट! नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात फायनलचे तिकीट; पाहा अविस्मरणीय क्षण

Paris Olympic 2024 : कडक सॅल्युट! नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात फायनलचे तिकीट; पाहा अविस्मरणीय क्षण

neeraj chopra match olympic 2024 : भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलचे तिकीट मिळवण्यात त्याने यश मिळवले. मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे तो आता सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकाला गवसणी घालतो का याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे. ८ तारखेला नीरज पदकासाठी मैदानात असेल. नीरजने पहिल्याच प्रयत्नात अविस्मरणीय कामगिरी केली.

भारतीय थलेटिक्स विश्वाला सोनेरी दिवसांची अनुभूती देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवे कीर्तिमान रचण्यासाठी ८ तारखेला मैदानात उतरेल. टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याबरोबरच १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यावेळी नीरजच्या खांद्यावर असेल. तसेच त्याच्यासमोरचे आव्हान काहीसे कठीण असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे. आज, मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. या फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरजने लक्ष्यापेक्षा ४ मीटर लांब भाला फेकला अन् फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मागील काही कालावधीपासून नीरजने अनेकदा दुखापतीचा सामना केला.

नीरज चोप्राला पहिल्याच प्रयत्नात यश

ऑलिम्पिकच्या इतिहासात सलग सुवर्ण जिंकणारे भालाफेकपटू 

एरिक लेमिंग, स्वीडन (१९०८, १९१२)

जोन्नी मायरा, फिनलँड (१९२०, १९२४)

जान जेलेंजी, झेक प्रजासत्ताक (१९९२, १९९६)

आंद्रीयास टी, नॉर्वे (२००४, २००८)

Web Title: Paris Olympic 2024 india's Neeraj Chopra ticket to finals in first attempt in javelin throw Watch here the unforgettable moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.