ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:30 PM2024-08-01T15:30:47+5:302024-08-01T15:41:59+5:30

Swapnil Kusale :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने भारताला तिसचे ब्राँझ पदक जिंकून दिलं आहे.

Paris Olympic 2024 mens individual 50m r3p shooting swapnil kusale won bronz medal | ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो?

ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो?

Paris Olympic 2024 :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताला तिसरं पदक मिळालं आहे. भारताचा नेमबाज  स्वप्नील कुसळेने जबरदस्त कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावलं आहे. पुरुष नेमबाजीत ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये तिसरे स्थान मिळवून त्याने भारताला आणखी एक कांस्यपदक मिळवून दिले. भारताने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये एकाच खेळात तीन पदके जिंकली आहेत. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्यानंतर स्वप्नील कुसळे हा नेमबाजीमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा तिसरा नेमबाज ठरला आहे.

कोल्हापुरच्या स्वप्निल कुसळेने अवघड अशा ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावल्याने देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. या स्पर्धेत स्वप्निलचा एकूण स्कोर ४५१.४ होता. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्निल हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वप्नील कुसळेचे अभिनंदन केले आहे. स्वप्निलची कामगिरी विशेष आहे कारण त्याने उत्तम लवचिकता आणि कौशल्य दाखवले. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्याचे आभार मानले आहेत.

स्वप्निल कुसळेने कांस्य पदक जिंकलेली ५० मीटर रायफल ३ पोझिशन ही स्पर्धा सहसा अवघड मानली जाते. स्वप्निल कुसळेने या स्पर्धेत  १०.० गुण मिळवूनही कांस्यपदक जिंकले. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ आहे. मात्र ही स्पर्धा नेमकी खेळली कशी जाते आणि ती इतकी अवघड का मानली जाते. जाणून घेऊया...

रायफल शूटिंगमध्ये, खेळाडू एका ठराविक अंतरावर १०  वर्तुळ असलेल्या बोर्डवर लक्ष्य करतात. ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. ज्यामध्ये ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स आणि १० मीटर एअर रायफल यांचा समावेश आहे.

५० मीटर एअर रायफल ३ पोझिशनमध्ये तीन प्रकार असतात. म्हणून त्याला थ्री पोझिशन असं म्हटलं जातं. निलिंग पोझिशन (गुडघ्यावर बसून), प्रोन प्रोझिशन (पोटावर झोपून) आणि स्टँडिंग पोझिशन (उभं राहून) असे या खेळाचे तीन प्रकार आहेत.

पहिल्यांदा गुडघ्यावर बसून त्यानंतर पोटावर झोपून आणि शेवटी उभं राहून बोर्डवर निशाणा साधायचा असतो. शूटरला या तीन वेगवेगळ्या पोझिशनमध्ये स्कोर करायचे असतात. प्रोन पोझिशनमध्ये रायफलला सर्वाधिक स्थिरता आवश्यक असते. तसेच स्टँडिंग पोझिशनमध्ये रायफलला स्थिरता देणे एक कठीण असते आणि तिथेच खेळाडूचा कस लागतो.

प्रत्येक खेळाडू या तीन पोझिशनमध्ये २ तास ४५ मिनिटांच्या निर्धारित वेळेत ४० शॉट्स मारतो. सर्वाधिक गुण मिळवणारे ८ नेमबाज पदक फेरीत भाग घेतात. स्वप्नील या खेळात सुरुवातीला सातव्या आणि नंतर पाचव्या क्रमांकावर होता.

Web Title: Paris Olympic 2024 mens individual 50m r3p shooting swapnil kusale won bronz medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.