तुर्कीच्या नेमबाजाचा अनोखा 'स्वॅग', 2011 मध्येही विशेष उपकरणांशिवाय जिंकले होते पदक...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 10:17 PM2024-08-05T22:17:58+5:302024-08-05T22:18:26+5:30
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या युसूफ डिकेच यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Paris Olympic 2024 Yusuf Dikec video : एक हात खिशात, डोळ्यावर साधारण चष्मा, अंगावर एकदम साधे कपडे अन् रौप्य पदकावर निशाणा...पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेच(Yusuf Dikec) यांच्या अनोख्या 'स्वॅग'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. युसुफ डिकेचने कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय, विशेष लेन्स न लावता 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले.
तो व्हिडिओ व्हायरल...
51 वर्षीय युसूफ डिकेच यांचा पॅरिस ऑलिम्पिकमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू झाली. अशातच, त्यांचे नेमबाजी स्पर्धेचे जुने फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत. त्यांचा 2011 साली झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते पॅरिस ऑलिम्पिकप्रमाणेच कुठल्याही सुरक्षा उपकरणांशिवाय आणि विशेष लेन्स न वापरता शूटिंग करताना दिसत आहेत. ISSF ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, त्या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
We found the young Yusuf Dikec archive footage 👀
— ISSF (@issf_official) August 4, 2024
The Turkish shooter didn’t even wear glasses in 2011 😅#ISSF | #ShootingSport | #HitTheMarkpic.twitter.com/v5O3VAgkAE
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकण्यापूर्वी डिकेच यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर त्यांनी 2012 च्या लंडन ऑलिम्पिक, 2016 च्या टोकियो ऑलिम्पिक आणि 2020 च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला होता, पण त्यात त्यांना अपयश आले. आता अखेर इतक्या वर्षांनंतर त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या वयात नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकणारे ते पहिलेच खेळाडू ठरले आहेत.