Paris Olympics 2024 : रमिताचा नेम चुकल्यानं भारताचं पदक हुकलं; २० वर्षीय खेळाडू फायनलमध्ये पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:07 PM2024-07-29T13:07:05+5:302024-07-29T13:22:14+5:30

Paris Olympics 2024 News Latest : रमिता जिंदालचा फायनलमध्ये पराभव झाला. 

Paris Olympic 2024 Updates In Marathi India's Ramita Jindal couldn't Win Medals In Women's 10m Air Rifle Final | Paris Olympics 2024 : रमिताचा नेम चुकल्यानं भारताचं पदक हुकलं; २० वर्षीय खेळाडू फायनलमध्ये पराभूत

Paris Olympics 2024 : रमिताचा नेम चुकल्यानं भारताचं पदक हुकलं; २० वर्षीय खेळाडू फायनलमध्ये पराभूत

Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक जिंकण्याच्या इराद्याने रमिता जिंदाल फायनलमध्ये खेळली. सुरुवातीला रमिताने पहिल्या तीनमध्ये आपले स्थान कायम ठेवले होते. पहिल्या ८ शॉट्सनंतर रमिता तिसऱ्या क्रमांकावर होती. मग १० शॉट्सनंतर दहाव्या क्रमांकावर असलेली रमिता 'करा किंवा मरा' अशा स्थितीत होती. हळूहळू खेळात सुधारणा करत रमिताने सहाव्या स्थानी झेप घेतली. तरीदेखील आव्हान संपले नव्हते. चीन आणि कोरियाचे शिलेदार पहिल्या दोन क्रमांकावर कायम होते. काही चुकांमुळे रमिताला पदकाच्या शर्यतीत कायम राहता आले नाही. १० मीटर एअर रायफल महिलांच्या अंतिम फेरीत रमिताने संघर्ष केला पण तिला पदक जिंकता आले नाही. अखेर ती सातव्या स्थानी राहिल्याने भारतीय शिलेदाराचा फायनलमध्ये पराभव झाला. 

नेमबाज मनू भाकरने रविवारी कांस्य पदक जिंकले. या क्षेत्रात पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. रविवारी नेमबाज रमिता जिंदाल फायनलसाठी पात्र ठरली होती. भारताच्या रमिता जिंदालने १० मीटर एअर रायफल महिला एकेरीत ऐतिहासिक कामगिरी करून फायनलचे तिकीट मिळवले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली. २० वर्षीय रमिता जिंदालने पात्रता फेरीत ६३१.५ गुण मिळवून अंतिम फेरी गाठली होती. तिने सर्व सहा सीरिजमध्ये १०० पेक्षा जास्त स्कोअर केला. याच स्पर्धेत भारताची इलावेनिल ही ६३०.७ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिली. त्यामुळे तिला अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही. (Ramita Jindal news) अव्वल आठ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरत असतात. भारताची रमिता पाचव्या स्थानी राहिल्याने तिला फायनलचे तिकीट मिळाले. दुसरी भारतीय स्पर्धक एलावेनीलचे शेवटचे दोन शॉट चुकल्याने तिला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. एकूणच तिची थोडक्यात संधी हुकली. (Paris 2024, Shooting Who is Ramita)

दरम्यान, १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठ खेळाडू होते. फायनलमध्ये सुरुवातीला ५ शॉट्सच्या दोन सीरिज असतात (प्रत्येक शूटरसाठी ५ + ५ शॉट्स (एकूण १० शॉट्स). २५० सेकंदात एक शॉट्स पूर्ण करणे गरजेचे असते. यातील प्रत्येक २ शॉट्सनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक मिळेपर्यंत सर्वात कमी गुण मिळवणारा नेमबाज स्पर्धेबाहेर होत गेला. सातव्या स्पॉट एलिमिनेशनसाठी रमिता आणि फ्रेंच नेमबाज यांच्यात लढत झाली. पण रमिताचा नेम चुकल्याने तिला सातव्या स्थानावरच समाधान मानावे लागले. पहिल्या तीन स्थानावर राहिलेले खेळाडू सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी पात्र ठरतात.

Web Title: Paris Olympic 2024 Updates In Marathi India's Ramita Jindal couldn't Win Medals In Women's 10m Air Rifle Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.