Paris Olympic 2024 : लेकीचं यश पाहून बापमाणूस भारावला; मनू भाकरच्या वडिलांचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:24 PM2024-07-30T17:24:02+5:302024-07-30T17:36:57+5:30

India in Olympics 2024 : मनू भाकरच्या नावावर आणखी एका कांस्य पदकाची नोंद.

Paris Olympic 2024 updates manu bhaker and sarabjot singh Manu Bhaker's father talking about Manu's win | Paris Olympic 2024 : लेकीचं यश पाहून बापमाणूस भारावला; मनू भाकरच्या वडिलांचा आनंद गगनात मावेना

Paris Olympic 2024 : लेकीचं यश पाहून बापमाणूस भारावला; मनू भाकरच्या वडिलांचा आनंद गगनात मावेना

Paris Olympic 2024 Updates In Marathi : आपली लेक मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदक जिंकताच तिच्या वडिलांनी भारी प्रतिक्रिया दिली. भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदक जिंकण्याची किमया साधली. रविवारी मनू भाकरने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते. मंगळवारी यात भर पडली असून, तिने सरबजोत सिंगसोबत आणखी एका पदकाला गवसणी घातली. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला.

मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला. याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. (manu bhaker latest news) मनू तिच्या या यशाचे श्रेय तिच्या आई वडिलांना देते. 

मनूच्या वडिलांनी विजयानंतर सांगितले की, मला तुम्हा सगळ्यांचा उत्साह पाहून खूप आनंद होत आहे. माझ्या मुलीने देशवासियांना खूप मोठी खुशखबर दिली आहे. सर्वांनी प्रेम आणि साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार. मनूच्या कठीण काळात ज्यांनी तिला मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार. एक शॉट्स चुकल्याने सुवर्ण पदक जिंकू शकले नाही असे तिने मला सांगितले. मनूसाठी माझ्यापेक्षा माझ्या पत्नीने खूप मेहनत घेतली आहे. कारण मी भारतीय नौदलात नोकरी करतो.

२२ वर्षीय लेकीची कमाल 

पिस्तूल खराब झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूला पुढील फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेबाहेर होताच ती भावुक झाली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते. नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले. आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.

Web Title: Paris Olympic 2024 updates manu bhaker and sarabjot singh Manu Bhaker's father talking about Manu's win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.