Paris Olympic 2024 : "तू हरली नाही,तुला हरवलं..." विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनिया,साक्षी मलिक काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:24 AM2024-08-08T09:24:10+5:302024-08-08T09:24:41+5:30

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, विनेश फोगाटने निवृत्ती जाहीर केली आहे.

Paris Olympic 2024 What did Bajrang Punia, Sakshi Malik say after Vinesh Phogat's retirement? | Paris Olympic 2024 : "तू हरली नाही,तुला हरवलं..." विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनिया,साक्षी मलिक काय म्हणाले?

Paris Olympic 2024 : "तू हरली नाही,तुला हरवलं..." विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनिया,साक्षी मलिक काय म्हणाले?

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल कुस्तीपटू विनेश फोगाटला १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, आता विनेश फोगाटने मोठा निर्णय घेतला असून तिने सोशल माडियावर पोस्ट करुन निवृत्ती जाहीर केली आहे. आता खेळाडूंकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Vinesh Phogat : "अलविदा कुश्ती!" विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली!

साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. तिने आता विनेश फोगाटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "विनेश, तू हरली नाहीस, प्रत्येक मुलगी हरली आहे, जिच्यासाठी तू लढलीस आणि जिंकलीस. हा संपूर्ण देशाचा पराभव आहे. देश तुमच्या पाठीशी आहे. एक खेळाडू म्हणून संघर्षाला सलाम.

बजरंग पुनियाची प्रतिक्रिया काय?

कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बजरंग पुनिया याने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'विनेश तू हरली नाही, तुला हरवलं, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील. तू भारताची कन्या आहेस तसेच भारताचा अभिमान आहेस'.

१०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले. विनेश फोगाटचे बुधवारी वजन ५० किलोपेक्षा त्यात १०० ग्रॅम जास्त होतं. याआधी म्हणजेच मंगळवारी जेव्हा वजन मोजले तेव्हा तिचे वजन ४९.९० ग्रॅम एवढे होते. हे ५० किलो कॅटेगरीसाठी होते. मिळालेल्या माहितीनुसार, सेमीफायनल सामन्यानंतर त्यांना खायला देण्यात आले यानंतर त्यांच वजन ५२.७०० किलो ग्रॅम वजन झाले. यानंतर त्यांच्या वैद्यकीय पथकाने रात्रभर विनेश फोगाटचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रात्रभर व्यायाम करायला लावला. तिने रात्रभर स्किपिंग आणि सायकलिंग केले. यानंतर विनेशचे वजन कमी झाले, पण सर्व प्रयत्न करूनही ५० ते १०० ग्रॅम वजन जास्तच राहिले.

गगन नारंग, दिनशॉ पार्डीवाला, तिचे पती, फिजिओ, वैद्यकीय कर्मचारी, IOA अधिकारीयांनी विनेशचे वजन कमी करण्यासाठी रात्रभर काम केले.

Web Title: Paris Olympic 2024 What did Bajrang Punia, Sakshi Malik say after Vinesh Phogat's retirement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.