Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या २८ जुलैचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:48 AM2024-07-28T11:48:06+5:302024-07-28T11:51:00+5:30
Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये ओलिम्पिक सुरू झाले आहे. यावेळी ११७ भारतीय खेळाडूंनी ओलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे.
Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुरू झाले असून आजचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी चांगली सुरूवात केली.आज ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भारतीय संघ बॅडमिंटन, नेमबाजी, नौकानयन, टेबल टेनिस आणि जलतरण या खेळांमध्ये सहभाग घेणार आहेत.अनेकांच्या नजरा या स्पर्धेवर लागल्या आहेत.
तर दुसरीकडे मनू भाकर १० मीटर पिस्टलच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी असणार आहे, तिच्यावरही देशाच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय पीव्ही सिंधूही आजच ऑलिम्पिकमधील स्पर्धेत खेळायला सुरुवात करणार आहे.
Paris Olympic 2024 : चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी
आज या स्पर्धेत भारतीय खेळाडू खेळणार
बॅडमिंटन
महिला एकेरी (ग्रुप स्टेज): पीव्ही सिंधू विरुद्ध एफएन अब्दुल रज्जाक (मालदीव), दुपारी १२:५०
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): एचएस प्रणॉय विरुद्ध फॅबियन रॉथ (जर्मनी), रात्री ८ वा.
शूटिंग
महिलांची १० मीटर एअर रायफल पात्रता: इलावेनिल वालारिवन, दुपारी १२.४५
पुरुषांची १० मीटर एअर रायफल पात्रता: संदीप सिंग आणि अर्जुन बबुता, २.४५ वा.
महिला १० मीटर एअर पिस्टल फायनल: मनू भाकर, दुपारी ३.३० वा.
नौकानयन
पुरुष एकेरी स्कल्स: बलराज पवार, दुपारी १.१८ वा.
टेबल टेनिस
महिला एकेरी (दुसरी फेरी): श्रीजा अकुला विरुद्ध क्रिस्टीना कलबर्ग (स्वीडन) - दुपारी १२.१५
महिला एकेरी (दुसरी फेरी): मनिका बत्रा बनाम विरुद्ध अण्णा हर्से (ग्रेट ब्रिटन) - दुपारी १२.१५
पुरुष एकेरी (दुसरी फेरी): शरथ कमल विरुद्ध डेनी कोझुल (स्लोव्हेनिया) - दुपारी ३.००
जलतरण
पुरुषांची १०० मीटर बॅकस्ट्रोक (हीट 2): श्रीहरी नटराज -
दुपारी ३.१६
महिलांची २०० मी फ्रीस्टाइल (हीट 1): धिनिधी देसिंगू - दुपारी ३.३० वा.
धनुर्विद्या
महिला संघ (उपांत्यपूर्व फेरी): भारत (अंकिता भक्त, भजन कौर आणि दीपिका कुमारी) विरुद्ध फ्रान्स/नेदरलँड्स - संध्याकाळी ५.४५ वा.
महिला संघ (उपांत्य फेरी): संध्याकाळी ७.१७ नंतर
महिला संघ (पदक टप्प्यातील सामने): रात्री ८.१८ नंतर