Paris olympic 2024: धावपटूला प्रियकराने पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 10:06 PM2024-09-05T22:06:33+5:302024-09-05T22:07:16+5:30
याप्रकरणी आरोपीला कडक शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.
Paris olympic 2024 : काही दिवसांपूर्वीच पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत युगांडाची धावपटू रेबेका चेप्टेगी हिनेही(Rebecca Cheptegei) सहभाग नोंदवल होता. पण, आता रेबेकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेबेकाच्या माजी प्रियकराने तिच्यावर पेट्रोल शिंपडून तिला पेटवून दिले होते, ज्यात ती 75 टक्के भाजली होती. रेबेकाला गंभीर अवस्थेत केनियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान आज(दि.5) तिचा मृत्यू झाला.
2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रेबेका चेप्टेगीला 44 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, रेबेकाच्या हत्येमुळे युगांडामध्ये शोककळा पसरली असून, तिच्या माजी प्रियकरावर कडक कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रेबेकाचे कुटुंब आणि चाहते तिच्या मृत्यूमुळे खूप दु:खी असून तिला न्याय मिळण्याची मागणी करत आहेत.
We have learnt of the sad passing on of our Olympic athlete Rebecca Cheptegei OLY following a vicious attack by her boyfriend. May her gentle soul rest in peace and we strongly condemn violence against women. This was a cowardly and senseless act that has led to the loss of a… pic.twitter.com/V8Mog3oMOX
— Donald Rukare (@drukare) September 5, 2024
काय म्हणाले ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष?
या घटनेवर युगांडाच्या ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष डोनाल्ड रुकारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटेल की, आम्हाला दुःखद बातमी मिळाली की, आमची ऑलिम्पिक ऍथलीट रेबेका चेप्टेगी आता या जगात नाही. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो.
दोघांमध्ये वाद सुरू होता
मिळालेल्या माहितीनुसार, रेबेका आणि तिचा माजी प्रियकर यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, रेबेका गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 14व्या स्थानावर होती. तर, 2022 मध्ये तिने थायलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड माउंटन आणि ट्रेल रनिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते.