व्हेंडिंग मशीनमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही; मनूसह विनेश फोगाटवर व्यक्त झाला बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 03:15 PM2024-08-11T15:15:22+5:302024-08-11T15:21:07+5:30

मनू भाकरचं कौतुक अन् विनेश फोगाटबद्दल सहानुभूती

Paris Olympics 2024 Abhinav Bindra On Manu Bhaker Vinesh Phogat Says Winning Medal Not Like Taking Coin From Vending Machine | व्हेंडिंग मशीनमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही; मनूसह विनेश फोगाटवर व्यक्त झाला बिंद्रा

व्हेंडिंग मशीनमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही; मनूसह विनेश फोगाटवर व्यक्त झाला बिंद्रा

ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतााचा पहिला गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा यांने पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. खास करून त्याने नेमबाज मनू भाकरचं तौंडभरून कौतुक केले आहे. याशिवाय तो विनेश फोगाट प्रकरणावरही बोलला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंकडून दुहेरी पदकाची अपेक्षा होती. पण टोकियोच्या तुलनेतही आपण यावेळी मागे राहिलो. 

अभिनव बिंद्रा समाधानी

पण अभिनव बिंद्राला मात्र आपण फार काही गमावलं आहे, असे वाटत नाही. भारतीय खेळाडू आणि स्पर्धेत मिळालेल्या पदकाबद्दल त्याने रोखठोक मत मांडले आहे. चौथ्या क्रमांकावर राहणं ही देखील एक उल्लेखनिय कामगिरीच आहे, असे तो म्हणाला आहे. मनू भाकरचं त्याने खास कौतुक केले. एका ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं कमावणं खूप मोठी गोष्ट आहे, असे म्हणत त्याने युवा महिला नेमबाजावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.

विनेश फोगाट प्रकरणासंदर्भात काय म्हणाला अभिनव बिंद्रा

'आजतक'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्याने विनेश फोगाट हिच्यासंदर्भातील अपात्रतेच्या मुद्यावरही भाष्य केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून सकारात्मक निकालाची आशा आहे, असेही तो म्हणाला. खेळ हा नियमानुसार खेळला जातो. जे प्रकरण घडलं अनपेक्षित होते. संबंधित प्रकरणानंतर विनेशची भेट घेतली. तिच्याप्रती सहानुभूती आहे, ही गोष्टही  अभिनव बिंद्नानं सांगितली. 

व्हेंडिंग मशीनमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही 

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू अगदी पदकाच्या उंबरठ्यावर जाऊन पराभूत झाले. यासंदर्भात अभिनव बिंद्रा म्हणाला की, "व्हेडिंग मशीमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही. हे एक मोठ चॅलेंज असते. एकूण १० हजार खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात. यातील फक्त ३०० खेळाडूंना सुवर्ण पदक मिळवतात. त्यामुळे ही स्पर्धा गाजवण्यासाठी कठोर मेहनतीसह तुमच्या नशीबाचीही साथ मिळावी लागते." काय मिळवलं काय गमावलं याची दोन दिवस चर्चा होईल. त्यानंतर सर्व विसरून एंजिल्स येथे होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकवर स्पर्धेवर फोकस होईल जे २०२८ मध्ये होणार आहे, असे  अभिनव बिंद्रानं म्हटले आहे. ऑलम्पिकमध्ये भारताला कमी पदकं मिळाली, असा युक्तीवाद करणाऱ्यांवर त्याने नाव न घेता निशाणा साधल्याचे दिसते. 

वैयक्तिक इवेंटमध्ये गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय
 
अभिनव बिंद्रानं २००८ मध्ये बीजिंग येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण कामगिरी करून दाखवली होती. वैयक्तिक इवेंटमध्ये सुवर्ण पटकणारा भारताचा तो पहिला खेळाडूही ठरला होता. त्यानंतर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक  स्पर्धेत तो चौथ्या स्थानावर राहिला होता. त्याचे पदक एका क्रमांकामुळे हुकलं होते.  

Web Title: Paris Olympics 2024 Abhinav Bindra On Manu Bhaker Vinesh Phogat Says Winning Medal Not Like Taking Coin From Vending Machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.