Paris Olympics 2024: भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेची निराशाजनक सुरुवात; तिरंदाजांच्या दोन्ही जोड्यांचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 02:43 PM2024-07-27T14:43:33+5:302024-07-27T14:44:59+5:30
10M Air Rifle Mixed Indian Team, Paris Olympics 2024: भारतासाठी आजच्या दिवसात केवळ ही एकमेव पदकांची स्पर्धा होती.
10M Air Rifle Mixed Indian Team, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची सुरुवात भारतासाठी फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच दिवशी (२७ जुलै) भारतीय नेमबाजांनी निराशा केली. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत दोन्ही भारतीय जोडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. इलावेनिल वालारिवन आणि संदीप सिंग ही जोडी १२व्या स्थानी राहिली. तर रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता यांनी सहावा क्रमांक पटकावला. रमिता-अर्जुनने एकूण ६२८.७ गुण मिळवले. तर इलावेनिल-संदीप यांना ६२६.३ गुण मिळाले. पण दोन्ही जोड्यांचे आव्हान संपुष्टात आली.
🇮🇳 Update: 10M AIR RIFLE MIXED TEAM QUALIFICATION Results 👇🏼
— SAI Media (@Media_SAI) July 27, 2024
- Ramita Jindal and Arjun Babuta finished 6th with a score of 628.7
- Elavenil Valarivan and Sandeep Singh finished 12th with a score of 626.3
Tune into DD Sports and Jio Cinema to watch LIVE!
Let’s #Cheer4Bharatpic.twitter.com/CemQHJ93rK
केवळ 'टॉप-4' संघच अंतिम फेरीत:-
१० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत केवळ 'टॉप-4' संघच पदक फेरीसाठी पात्र ठरले. या स्पर्धेचा अंतिम सामना २७ जुलै रोजी होणार आहे. भारतासाठी आजच्या दिवसात केवळ ही एकमेव पदकांची स्पर्धा होती. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताकडून पदक जिंकण्याचा विक्रम वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या नावावर आहे. तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. यावेळी मात्र पहिल्या दिवशी भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
- १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी:-
- रमिता जिंदाल- पहिली फेरी: १०४.६, दुसरी फेरी १०४.४, तिसरी फेरी १०५.५, एकूण: ३१४.५ गुण
- अर्जुन बबुता- पहिली फेरी: १०४.१, दुसरी फेरी १०६.२, तिसरी फेरी १०३.९, एकूण: ३१४.२ गुण
- इलावेनिल वालारिवन- पहिली फेरी: १०३.४, दुसरी फेरी १०४.७, तिसरी फेरी १०४.५, एकूण: ३१२.६ गुण
- संदीप सिंग- पहिली फेरी: १०४.१, दुसरी फेरी १०५.३, तिसरी फेरी १०४.३, एकूण: ३१३.७ गुण