Paris Olympics 2024 : "गोल्ड आणायचं आहे..."; पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटचं आईला वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 07:57 AM2024-08-07T07:57:16+5:302024-08-07T07:58:00+5:30

विनेश ऑलिम्पिक कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला, तर सुशीलकुमार आणि रवीकुमार दहिया यांच्यानंतरची तिसरी भारतीय ठरली. यानंतर तिने आपल्या आईसोबत बोलताना सुवर्णपदक आणणार आसल्याचे म्हटले आहे...

Paris Olympics 2024 : Got to bring gold Vinesh Phogat's promise to his mother from Paris Olympics | Paris Olympics 2024 : "गोल्ड आणायचं आहे..."; पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटचं आईला वचन

Paris Olympics 2024 : "गोल्ड आणायचं आहे..."; पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटचं आईला वचन

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची आघाडीची महिला मल्ल विनेश फोगाट हिने ५० किलो फ्री स्टाइल गटात ऐतिहासिक कामगिरी करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. मंगळवारी 6 ऑगस्टला चॅम्प-डे-मार्स एरिना मॅट बीमध्ये सेमीफाइनलच्या सामन्यात क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेड़ाविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळवत विनेश ऑलिम्पिक कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला, तर सुशीलकुमार आणि रवीकुमार दहिया यांच्यानंतरची तिसरी भारतीय ठरली. यानंतर तिने आपल्या आईसोबत बोलताना सुवर्णपदक आणणार आसल्याचे म्हटले आहे...

या ऐतिहासिक विजयानंतर, विनेश फोगाट व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने आपल्या आईसोबत बोलली. विनेश फोगाट आपल्या कुटुंबातील सदस्यांना फ्लाइंग किस पाठवताना भावूक झाल्याचे दिसून आले. व्हिडिओच्या शेवटच्या भागात, फोगाट, "गोल्ड आणायचे आहे!" असे म्हणताना दिसत आहे.

आता सुवर्णपदकासाठी अमेरिकेच्या साराह अॅन हिल्डेब्रेटसोबत भिडणार -
आता विनेशला सुवर्णपदकासाठी अमेरिकेच्या साराह अॅन हिल्डेब्रेट हिच्याविरुद्ध भिडायचे आहे. ही लढत जिंकल्यास विनेश ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय मल्ल ठरेल. सावध सुरुवात केलेल्या विनेशने अचानकपणे आक्रमक खेळ करत लोपेझला दडपणाखाली आणली. तिच्या पायांवर आक्रमक पकड करताना विनेशने गुणांची कमाई करत सामन्यावर पकड मिळवली. मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना विनेशने सहज अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याआधी, विनेशने जगज्जेती आणि अव्वल मानांकित जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करत विनेशने आपल्या मोहिमेला दिमाखात सुरुवात केली होती. यानंतर तिने युक्रेनच्या आठव्या मानांकित ओसाना लिवाचला ७-५ 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किलोग्रॅम कुस्तीच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक प्रवेश मिळवल्यानंतर, आपल्या आईसाठी सुवर्णपदक आणणार आसल्याचे म्हटले आहे. 

अवघ्या दहा सेकंदात फिरवला सामना
विनेशने दणक्यात आपल्या मोहिमेला सुरुवात करताना पहिल्या फेरीत जगज्जेत्या युई सुसाकी हिला नमवले. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षात सुसाकीने केवळ तीन पराभव पत्करले आहेत. त्यामुळे तिला नमवणे विनेशपुढे अत्यंत कठीण आव्हान होते. त्यातच, सामन्यातील अखेरची १० सेकंद शिल्लक असताना विनेश ०-२ अशी पिछाडीवर होती. परंतु, येथून तिने जबरदस्त मुसंडी मारत ३-२ अशी बाजी मारली. सुसाकीला टेकडाऊन करत विनेशने दोन गुण मिळविल्यानंतर जपानी संघाने याविरुद्ध अपील केले. परंतु, रेफ्रींनी व्हिडीओ पाहिल्यानंतर हे अपील फेटाळून लावले आणि विनेशला एक अतिरिक्त आणि निर्णायक गुण मिळाला.

विनेशने २०१८मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.
• विनेशने ग्लास्गो २०१४ (४८ किलो). गोल्ड कोस्ट २०१८ (५० किलो) आणि बर्मिंगहॅम २०२२ (५३ किलो) या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
• जागतिक स्पर्धेत तिने २०१९ आणि २०२२मध्ये ५३ किलो वजनी गटात दोन कांस्यपदके जिंकली आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू आहे. 
• विनेशने आतापर्यंत जागतिक पातळीवर एकूण २६ पदके जिंकली आहेत.

ही तीच मुलगी आहे जिला दिल्लीच्या रस्त्यांवरून ओढत नेले होते. ही तीच मुलगी आहे, जिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आज ही मुलगी जग जिंकली पण ती भारतीय सिस्टीमसमोर हरलेली आहे.
- बजरंग पुनिया


 

Web Title: Paris Olympics 2024 : Got to bring gold Vinesh Phogat's promise to his mother from Paris Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.