Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:56 PM2024-07-26T21:56:25+5:302024-07-26T21:58:28+5:30

या अविस्मरणीय प्रोपोजचे फोटो अधिकृतपणे शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Paris Olympics 2024 Handball player proposed to hockey player then celebrated by kissing in front of everyone | Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO

Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO

आता पॅरिस ऑलिम्पिकची प्रतीक्षा संपली आहे. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या जवळपास सर्वच देशांचे खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये थांबले आहेत. या सर्वच खेळाडूंची नजर पदकावर असणार आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वीच काही खेळांनाही सुरवात झाली आहे. पण मेगा इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना एक अनोखी लव्ह स्टोरी बघायला मिळाली आहे. जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

अर्जेंटीनाच्या प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज - 
अर्जेंटीनाच्या हँडबॉल प्लेअरने एका हॉकीपटूला प्रपोज करण्यासाठी एक सरप्राइज प्लॅन तयार केला होता. याचा व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रपोज करणाऱ्या या हँडबॉल प्लेअरचे नाव आहे पाब्लो सिमोनेट. त्याने आपल्याच देशाची महिला हॉकीपटू मारिया कॅम्पॉयला प्रपोज केले. फोटो सेशन सुरू असतानाच सिमोनेटने मारियाला सरप्राइज केले. यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि सार्वसमोर किस करत आनंद व्यक्त केला.

ऑलिम्पिकनं शेअर केला फोट - 
या अविस्मरणीय प्रोपोजचे फोटो अधिकृतपणे शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र, या दोन्ही खेळाडूंसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. मारियानेही प्रपोजचा स्वीकार केला आणि सर्व खेळाडू आनंदाने नाचू लागले.

Web Title: Paris Olympics 2024 Handball player proposed to hockey player then celebrated by kissing in front of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.