बाप्पा पावला! 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेचं दगडूशेठ गणपतीशी 'खास कनेक्शन', टॅटूही आहे स्पेशल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:00 PM2024-08-01T15:00:41+5:302024-08-01T15:03:03+5:30

Paris Olympics 2024, Swapnil Kusale: भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या पाठीवर एक खास टॅटू आहे, त्याचाही देवाशी संबंध आहे.

Paris Olympics 2024 India Swapnil Kusale bronze medal Maharashtra Srimant Dagadusheth Halwai Ganapati | बाप्पा पावला! 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेचं दगडूशेठ गणपतीशी 'खास कनेक्शन', टॅटूही आहे स्पेशल

बाप्पा पावला! 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेचं दगडूशेठ गणपतीशी 'खास कनेक्शन', टॅटूही आहे स्पेशल

अभिजित देशमुख पॅरिसहून...

Swapnil Kusale, Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंददायी ठरताना दिसत आहे. युवा मनू भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय ठरण्याचा मान मिळवला. त्यानंतर आज कोल्हापूरच्यास्वप्नील कुसाळे याने भारताला आणखी एख पद मिळवून दिले. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये २९ वर्षीय स्वप्नीलने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय नेमबाज ठरला. गणपती बाप्पाचा मोठा भक्त असलेला स्वप्नील याच्या पदकाच्या रुपाने महाराष्ट्राला तब्बल ७२ वर्षांनी वैयक्तिक मेडल मिळाले.


कोल्हापूरातील राधानगरीच्या कांबळवाडीत वाढलेला स्वप्नील सध्या पुण्यात राहतो. 'लोकमत'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत स्वप्नीलने तो गणपती बाप्पाचा भक्त असल्याचे आवर्जून सांगितले. "जेव्हा मी पुण्यात असतो, तेव्हा मी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आशीर्वाद घेतो. दररोज मंदिरात जाण्याचा माझा प्रयत्न असतो. माझी आई अत्यंत अध्यात्मिक आहे. विठूरायाची निस्सीम उपासक आहे. ती दररोज पूजा आणि जप करते. तिच्याकडूनच मलाही अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्यामुळे माझीची देवावर श्रद्धा आहे," असे स्वप्नील म्हणाला.

तो पुढे म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे, पण माझे आई-वडील आणि मित्र नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. अक्षय सुहास अष्टिपुत्र हा माजी रॅपिड फायर नेमबाज आहे. त्याची मला खूप मदत झाली. तो मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. पदकाची प्रक्रिया महत्त्वाची असते. मला काय मिळेल यापेक्षा ते कशाप्रकारे मिळवता येईल या प्रवासावर अधिक लक्ष केंद्रित करतो. माझ्या सर्व महाराष्ट्रीय बांधवांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद."


स्वप्नीलचे प्रशिक्षक, मनोज कुमार यांनी त्याची प्रशंसा करताना सांगितले, "स्वप्नील एक हुशार नेमबाज आहे, कधीकधी त्याचा संयम सुटतो. पण आम्ही त्यावरही मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. क्वचित मी त्याला ओरडतो पण इतर वेळी मात्र मी शांतपणे त्याच्याकडे जातो आणि म्हणातो- 'स्वप्नील, तू खरोखरच प्रतिभावान आहेस. मी तुला तुझ्या संपूर्ण आयुष्यात इतके चांगली कामगिरी करताना कधीही पाहिलेले नाही. असे ऐकल्याने त्याचा उत्साह अधिक वाढतो."

"स्वप्नीलने अभिमानाने महामृत्युंजय मंत्राचा त्रिशूळात टॅटू काढला आहे, तो खूप कलात्मक आहे. आमचा भोपाळला कॅम्प होता आणि मी विचारले, 'स्वप्नील, महाकाल?' त्याने उत्तर दिले, 'हो, चला जाऊया.' मग आम्ही एकत्र उज्जैनला गेलो आणि महाकालचा आशीर्वाद घेतला. त्याच्या बंदुकीवर अभिमानाने 'भारत' कोरलेले आहे," असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Paris Olympics 2024 India Swapnil Kusale bronze medal Maharashtra Srimant Dagadusheth Halwai Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.