६, ५, ४ अन् ३...! स्वप्नीलने नेम धरला; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा कसा जिंकत गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:51 PM2024-08-01T14:51:06+5:302024-08-01T14:51:16+5:30

swapnil kusale kolhapur : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले.

Paris Olympics 2024 Kolhapur's Swapnil Kusale won bronze medal, read here details | ६, ५, ४ अन् ३...! स्वप्नीलने नेम धरला; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा कसा जिंकत गेला

६, ५, ४ अन् ३...! स्वप्नीलने नेम धरला; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा कसा जिंकत गेला

Paris Olympics 2024 Day 6 Updates | पॅरिस : भारताला शूटींमधून आणखी एक पदक मिळाले असून, एकूण तीन पदकांची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. (swapnil kusale in final) अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. पण, अखेरच्या काही क्षणांमध्ये स्वप्नील इतर पाच खेळाडूंना वरचढ ठरला आणि त्याने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली. 

स्वप्नील कुसाळेने ४५१.४ गुणांसह कांस्य पदक आपल्या नावावर केले. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या स्वप्नीलने जोरदार कमबॅक केला. Kneeling ची अर्थात पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्नील पाचव्या स्थानावर होता. आता स्टँडिंग शॉट्स पदकांचे चित्र स्पष्ट करणारे होते. यात स्वप्नीलने चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. या राऊंडच्या अखेरपर्यंत यूक्रेनचा खेळाडू अव्वल तर चीनचा दुसऱ्या आणि भारताचा स्वप्नील तिसऱ्या स्थानावर राहिला. या घडीला पाच स्पर्धक स्पर्धेत जिवंत होते. पण यातील एक खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याने स्वप्नीलचे पदक पक्के झाले. कारण स्वप्नील आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूच्या गुणांमध्ये फार फरक होता. त्यामुळेच तिसऱ्या क्रमांकावर असलेला स्वप्नील पदक आणणार हे जवळपास निश्चित झाले. अखेर स्वप्नीलने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेच. 

स्वप्नील कसा जिंकत गेला?

नीलिंग (पहिली सिरीज) - ९.६, १०.४, १०.३, १०.५, १०.० - एकूण ५०.८ गुण
नीलिंग (दुसरी सिरीज) - १०.१, ९.९, १०.३, १०.५, १०.१ - एकूण ५१.९ गुण
नीलिंग (तिसरी सिरीज) - ९.७, १०.३, १०.८, १०.४, १०.० - एकूण ५१.६ गुण

प्रोन (पहिली सिरीज) - १०.५, १०.६, १०.५, १०.६, १०.५ - एकूण ५२.७ गुण
प्रोन (दुसरी सिरीज) - १०.८, १०.२, १०.५, १०.४, १०.३ - एकूण ५२.२ गुण
प्रोन (तिसरी सिरीज ) - १०.५, १०.४, १०.४, १०.२, १०.४ एकूण - ५१.९ गुण

स्टँडिग (पहिली सिरीज ) - ९.५, १०.७, १०.३, १०.६, १०.० - एकूण ५१.१ गुण
स्टँडिग (दुसरी सिरीज) - १०.६, १०.३, ९.१, १०.१, १०.३ - एकूण ५०.४ गुण

इतर चार शॉट्स - १०.५, ९.४, ९.९, १०.०० 

Web Title: Paris Olympics 2024 Kolhapur's Swapnil Kusale won bronze medal, read here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.