Paris Olympics 2024 : भारतासाठी धक्कादायक निकाल! तिरंदाजीत पदकाची आशा मावळली; दीपिका लढली पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:30 PM2024-08-03T17:30:58+5:302024-08-03T17:33:24+5:30

deepika kumari archery olympics 2024 : भारताच्या दीपिका कुमारीला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला.

 Paris Olympics 2024 Live Updates India's archer Deepika Kumari lost in quarter finals in archery  | Paris Olympics 2024 : भारतासाठी धक्कादायक निकाल! तिरंदाजीत पदकाची आशा मावळली; दीपिका लढली पण...

Paris Olympics 2024 : भारतासाठी धक्कादायक निकाल! तिरंदाजीत पदकाची आशा मावळली; दीपिका लढली पण...

Paris Olympics 2024 Live Updates | पॅरिस : उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी भारताची दीपिका आणि दक्षिण कोरियाची नॅम सू-ह्यून यांच्यात लढत झाली. भारताच्या दीपिका कुमारीने तिरंदाजीच्या क्वार्टर फायनलमध्ये पहिला सेट सहज जिंकला. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये दीपिका पिछाडीवर गेली. दुसरा सेट कोरियाच्या नॅमने जिंकला. अजून तीन सेट बाकी होते. त्यामुळे तीनपैकी किमान दोन सेट जिंकणाऱ्या शिलेदाराचा विजय निश्चित होता. दुसऱ्या सेटनंतर स्कोअर १-१ अशा बरोबरीत होता. तिसऱ्या सेटमध्ये दोन्हीही खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस झाली. पण अखेर दीपिकाने हा सेट जिंकून विजयाच्या दिशेने कूच केली. दीपिका या घडीला ४-२ ने पुढे होती. 

पिछाडीवर असलेल्या कोरियाच्या खेळाडूने जोरदार पुनरागमन करत स्कोअर ४-४ अशा बरोबरीत आणला. त्यामुळे शेवटचा सेट निर्णायक ठरला. या सेटमधील विजयी खेळाडू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार होता. 'करा किंवा मरा' अशा या सेटमध्ये दोन्हीही खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. पण, दीपिकाचा नेम चुकल्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला १ गुणाची आघाडी मिळाली आणि भारताच्या दीपिकाचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. दीपिका कुमारीला ४-६ असा पराभव पत्करावा लागला. 

आपल्या १९ महिन्यांच्या लेकीला भारतात ठेवून पॅरिसला गेलेली दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. दीपिका २०२२ मध्ये एका मुलीची आई झाली. ती अद्याप ऑलिम्पिकमधील तिच्या पहिल्या पदकाच्या शोधात आहे. मुलीपासून इतके दिवस लांब राहणे यामागे किती दु:ख लपले आहे हे शब्दांत मांडू शकत नाही. मी मागील अनेक वर्षांपासून ज्या पदकासाठी मेहनत करत आहे त्यासाठी हा त्याग आहे. मला मुलीची खूप आठवण येते, पण त्याला पर्यायही नाही, असे दीपिका सांगते. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. 

Web Title:  Paris Olympics 2024 Live Updates India's archer Deepika Kumari lost in quarter finals in archery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.