पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात; चीनच्या हे बिंग जिओने 21-19, 21-14 ने केला पराभव...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:12 PM2024-08-01T23:12:53+5:302024-08-01T23:13:16+5:30
पीव्ही सिंधूचे ऑलिम्पिक पदकांची हॅट्रिक साधण्याचे स्वप्नही भंगले.
Paris Olympic 2024 : पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2025 ) भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदकांवर नाव कोरले आहे. दरम्यान, आज भारताची स्टार बॅटमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिकपदक विजेत्या पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) सामना झाला. या सामन्यात चीनच्या हे बिंग जिओ (He Bingjiao) हिने सिंधूचा 21-19, 21-14 असा पराभव केला. या पराभवासह पीव्ही सिंधूचे ऑलिम्पिकमधी आव्हान संपुष्टात आले आहे.
#ParisOlympics2024 | Indian ace shuttler and two-time Olympic medallist PV Sindhu loses to He Bingjiao of China 19-21 and 14-21 in pre-quarterfinal of women's singles competition.
— ANI (@ANI) August 1, 2024
भारतातील लाखो-करोडो चाहते पीव्ही सिंधूच्या सामन्याकडे डोळा लावून होते. पण, आज तिने चाहत्यांची निराशा केली. सिंधूने पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिली, पण दुसऱ्या गेममध्ये चीनच्या हे बिंग जिओने मोठ्या फरकाने सामना आपल्या नावावर केला. या पराभवासह सिंधूचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील आव्हानही संपुष्टात आले आहे. तसेच, तिचे ऑलिम्पिक पदकांची हॅट्रिक साधण्याचे स्वप्नही भंगले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत 3 कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार शूटर मनू भाकरने पहिले पदक एकेरी खेळात, तर दुसरे पदक सरबजोत सिंगच्या साथीने आपल्या नावावर केले. याशिवाय, आज(1 ऑगस्ट) पुरुषांच्या 3 पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसळेने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदकावर आपले नाव कोरले. दरम्यान, टेबल टेनिसमध्ये भारताला पदकाची आशा आहे. श्रीजा अकुलाने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून, तेथे पोहोचणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.