मनू भाकरनं नीरज चोप्राबद्दल मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 03:06 PM2024-08-14T15:06:40+5:302024-08-14T15:08:24+5:30

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली.

paris olympics 2024 Manu Bhakar has commented on his relationship with Neeraj Chopra | मनू भाकरनं नीरज चोप्राबद्दल मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं

मनू भाकरनं नीरज चोप्राबद्दल मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं

Neeraj Chopra Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील रौप्य पदकविजेता नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावत नीरज आणि मनू लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली. (manu bhaker and neeraj chopra relationship) मात्र, मनूच्या वडिलांनी याला पूर्णविराम देत तिचे अद्याप लग्नाचे वय नसल्याचे सांगितले. (manu bhaker on neeraj chopra) आता खुद्द मनूने याबद्दल भाष्य केले आहे. तसेच तिने फ्युचर प्लॅनिंग सांगताना आवड जोपासणार असल्याचे म्हटले. (manu bhaker and neeraj chopra relationship news)

मनू भाकर म्हणाली की, माझ्यात आणि नीरजमध्ये असे काहीच नाही, ज्याची चर्चा रंगली आहे. तो एक वरिष्ठ खेळाडू आहे. मी पुढचे तीन महिने ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या कालावधीत मी व्हायोलिन वाजवीन आणि घोडेस्वारीचा आनंद घेईन. २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये आणखी चांगली कामगिरी करेन. मनू न्यूज १८ इंडिया या वृत्तसंस्थेशी बोलत होती. 
 
ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकणारे खेळाडू 
नीरज चोप्रा (भालाफेक) - रौप्य पदक
मनू भाकर (नेमबाज) कांस्य पदक
अमन सेहरावत (कुस्ती)  कांस्य पदक
भारतीय पुरूष हॉकी संघ - कांस्य पदक
स्वप्नील कुसाळे (नेमबाज) - कांस्य पदक
मनू भाकर-सरबजोत सिंग (नेमबाज) - कांस्य पदक 
 
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

Web Title: paris olympics 2024 Manu Bhakar has commented on his relationship with Neeraj Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.