Paris Olympics 2024 : मनू भाकर आज कांस्यपदकासाठी खेळणार; जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 10:27 AM2024-07-30T10:27:19+5:302024-07-30T10:28:25+5:30

India Schedule at Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज चौथ्या दिवशी मंगळवारी भारतीय खेळाडूंचे मोठे सामने होणार आहेत. आज शुटिंगमध्ये मनू भाकर खेळणार आहे.

Paris Olympics 2024 Manu Bhakar will play again in Olympics today; Know the schedule of Indian players | Paris Olympics 2024 : मनू भाकर आज कांस्यपदकासाठी खेळणार; जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक

Paris Olympics 2024 : मनू भाकर आज कांस्यपदकासाठी खेळणार; जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक

India Schedule at Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा आज चौथा दिवस आहे. आज मंगळवारी ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत. नेमबाजीत मनू भाकरने कांस्यपदक जिंकून भारताला पहिले पदक मिळवून दिले,आता चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मनू भाकर कांस्यपदकासाठी खेळणार आहे. मनू भाकर आज मिश्र सांघिक स्पर्धेत भाग घेणार आहे.

मनू भाकर १० मीटर एअर पिस्टल सांघिक टीममधून आज खेळणार आहे. ही स्पर्धा कांस्यपदकासाठी होणार आहे, या स्पर्धेत तिचा जोडीदार सरबज्योत सिंह असेल. याशिवाय बॅडमिंटनची स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीही आज मैदानात उतरणार आहेत.

बाळासह पॅरिस गाठणारे स्पेनचे असामान्य कुटुंब 

शूटिंग-

१० मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक कांस्यपदक सामना: भारत (मनू भाकर आणि सरबज्योत सिंह) विरुद्ध कोरिया – दुपारी १.०० वाजता – 

ट्रॅप पुरुष पात्रता: पृथ्वीराज तोंडाईमन – दुपारी १२.३० वाजता

 ट्रॅप महिला पात्रता: श्रेयसी सिंह आणि राजेश्वरी कुमारी: दुपारी ०१.२० वाजता

हॉकी-

पुरुष पूल बी सामना- भारत विरुद्ध आयर्लंड सायंकाळी- ४.४५ वाजता

तिरंदाजी-

महिला व्यक्तिगत १/३२ एलिमिनेशन फेरी: अंकिता भकत (सायंकाळी ५:१५) आणि भजन कौर (सायंकाळी ५:३०) 

पुरुष व्यक्तिगत १/३२ एलिमिनेशन फेरी: धीरज बोम्मादेवरा (रात्री १०:४५)

बॅडमिंटन- 

पुरुष (ग्रुप स्टेज)- सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध अल्फियान फजर आणि मुहम्मद रियान अर्दियांटो (इंडोनेशिया) सायंकाळी ५.३० वाजता

महिला  (गट स्टेज): अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध सेतयाना मपासा आणि एंजेला यू (ऑस्ट्रेलिया) – संध्याकाळी ६:२०

बॉक्सिंग -

पुरुषांची ५१ किलो १६वी फेरी- अमित पंघाल विरुद्ध पॅट्रिक चिन्येम्बा (झांबिया) - सायंकाळी ७.१५

- महिला ५७ किलो ३२ वी फेरी- जास्मिन लॅम्बोरिया विरुद्ध नेस्टी पेटेसिओ (फिलीपिन्स) - रात्री ९.२५

५४ किलो वजनी महिला प्री: ५४ किलोग्राम वि येनी मार्सेला एरियास (कोलंबिया) – दुपारी १.२० (३१ जुलै) 

 सात्विक-चिराग याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला

बॅडमिंटनमध्ये, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्या गटात सोमवारी होणारा सामना रद्द करण्यात आला. जागतिक क्रमवारीत-३ सात्विक-चिराग यांना त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेलचा सामना करावा लागला. पण लॅम्सफसच्या गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर सीडेलने माघार घेतली. यात चिराग-सात्विकने फायदा मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Web Title: Paris Olympics 2024 Manu Bhakar will play again in Olympics today; Know the schedule of Indian players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.