Paris Olympics 2024 : भारताच्या श्रीजानं कमाल केली; वाढदिवशी देशवासियांना गिफ्ट दिलं, लवलीनाचाही दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 04:21 PM2024-07-31T16:21:17+5:302024-07-31T16:23:08+5:30
Paris Olympics 2024 updates : श्रीजा अकुलाने तमाम देशवासियांना खुशखबर देताना राऊंड-१६ मध्ये प्रवेश केला.
Paris Olympic 2024 Updates In Marathi : पहिल्यांदाच ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या श्रीजा अकुलाने तमाम देशवासियांना खुशखबर देताना राऊंड-१६ मध्ये प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये २६ वर्षीय खेळाडूने चमकदार कामगिरी केली. तिने राऊंड-३२ मध्ये ४-२ असा विजय साकारला. श्रीजाने या विजयासह इतिहास रचला. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी ती दुसरी भारतीय महिला शिलेदार ठरली आहे.
भारतीय शिलेदारांची आजची कामगिरी
पीव्ही सिंधूचा सलग दुसरा विजय
लक्ष्य सेनचा 'करा किंवा मरा'च्या सामन्यात विजय
वाढदिवशी श्रीजा अकुलाने देशवासियांना दिली विजयाची भेट
महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेचा अंतिम फेरीत प्रवेश
लवलीना बोरगोहेनचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
श्रीजाची अप्रतिम कामगिरी
Sreeja Akula has a perfect birthday gift! 😄👏pic.twitter.com/dwUFF86U5z
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 31, 2024
आज बुधवारचा दिवस भारतासाठी खूप खास राहिला. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, श्रीजा अकुला, स्वप्नील कुसाळे आणि लवलीना बोरगोहेन यांनी विजय संपादन केला. महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने अंतिम फेरी गाठली आहे. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताची आणखी एक शिलेदार ऐश्वर्य प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिला अन् तो अंतिम फेरीला मुकला. खरे तर अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. ऐश्वर्य प्रतापला पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता न आल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे कोल्हापुरचा पठ्ठ्या भारताला पदक मिळवून देणार का हे पाहण्याजोगे असेल.
दरम्यान, भारताची स्टार महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने शानदार विजय नोंदवला. लवलीनाने हा सामना ५-० असा जिंकला. यासह तिने आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना आता पदक निश्चित करण्यापासून केवळ एक विजय दूर आहे.