'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ऑलिम्पिक Gold Medal जिंकण्याचा विक्रम; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:12 PM2024-08-11T18:12:51+5:302024-08-11T18:13:16+5:30

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चीन आणि अमेरिकेने सर्वाधिक पदके जिंकली आहेत.

Paris Olympics 2024 : Record holder of most Olympic gold medals | 'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ऑलिम्पिक Gold Medal जिंकण्याचा विक्रम; पाहा...

'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ऑलिम्पिक Gold Medal जिंकण्याचा विक्रम; पाहा...

Paris Olympics 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे खेळाचा 'महाकुंभ' म्हणजेच ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा भारताकडून 117 खेळाडू सहभागी झाले, पण कोणालाही सुवर्णपदक जिंकता आले नाही. परंतु इतर देशांतील काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकली आहेत. सुवर्णपदक जिंकण्यामध्ये अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपानसह अनेक देश आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये फ्रेंच अॅथलीट लिओन मार्चंडने सर्वाधिक 4 सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे.

एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकणारे खेळाडू
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जलतरणपटू लिओन मार्चंडने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक 4 सुवर्णपदके जिंकली आहेत. 22 वर्षीय लिओन मार्चंडची तुलना महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सशी केली जाते. मार्चंडने अवघ्या 2 तासांच्या कालावधीत 2 सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे. दुसऱ्या क्रमांकावर अनेक खेळाडू आहेत ज्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये 3-3 सुवर्णपदके जिंकली आहेत. यात यूएसएची टोरी हस्के, सिमोन बिल्स आणि गॅबी थॉमस, ऑस्ट्रेलियाची मॉली ओ'कॅलाघन यांचा समावेश आहे.

एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारे दोन खेळाडू
एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम दोन खेळाडूंच्या नावावर आहे. पहिला रशियन जिम्नॅस्ट ॲथलीट अलेक्झांडर डेटियाटिन आहे, ज्याने 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये 8 पदके जिंकली होती. यापैकी तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सने हा पराक्रम दोनदा केला. त्याने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदके जिंकली, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदके जिंकली. एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा मायकेल फेल्प्सच्या नावावर आहे. त्याच्या नावावर एकूण 28 ऑलिम्पिक पदके असून, यातील 26 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके आहेत.
 

Web Title: Paris Olympics 2024 : Record holder of most Olympic gold medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.