Olympics 2024 : बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 06:59 PM2024-08-10T18:59:57+5:302024-08-10T19:01:38+5:30

Paris Olympics 2024 updates : सायना नेहवालने अतिउत्साही चाहत्यांना सुनावले.

Paris Olympics 2024 Saina Nehwal slams cricket fans and her trolls for commenting on Jasprit Bumrah | Olympics 2024 : बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले

Olympics 2024 : बुमराह, क्रिकेट आणि बॉलिवूड! पदकांची संख्या अन् सायना संतापली? टीकाकारांना फटकारले

saina nehwal olympics : भारतातील क्रीडा संस्कृती आणि क्रिकेटला दिले जाणारे महत्त्व याबद्दल दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सातत्याने भाष्य करत आहे. क्रिकेटला प्राधान्य आणि इतर खेळांकडे होत असलेले दुर्लक्ष यावर बोट ठेवत तिने काही अतिउत्साही क्रिकेट चाहत्यांना डिवचल्याचे दिसते. यावरून तिला ट्रोल केले जात आहे. आता तिने याच ट्रोलर्स लोकांना प्रत्युत्तर देताना विविध बाबींवर भाष्य केले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. पण, भारताला केवळ सहा पदके जिंकता आली आहेत. यामध्ये पाच कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सायना नेहवालने पदकांची आशा बाळगणाऱ्या टोमणे मारले. 

सायनाच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटच्या तुलनेत बॅडमिंटन आणि टेनिससह इतर खेळ खूप साहसी आहेत. यामध्ये दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. सायनाचे हे विधान काही क्रिकेट चाहत्यांना खटकले. एकाने याबद्दल सोशल मीडियावर लिहिले होते की, सायना जसप्रीत बुमराहच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करू शकेल काय. यावर आता सायनाने एका पॉटकास्टमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

सायनाचे टीकाकारांना प्रत्युत्तर 
बॅडमिंटन खेळताना खूप थकवा जाणवतो. सतत हातांची हालचाल होत असते. हात वरती घेऊन स्ट्रोक खेळावे लागतात. बराच वेळ हातांची हालचाल होत असल्याने ते कठीण होते. मी अनेकदा बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याचे पाहिले आहे. बॅडमिंटन सर्वात कठीण खेळ आहे असे मी म्हणत नाही. टेनिस, पोहणे या खेळांचा देखील मी उल्लेख केला होता. क्रिकेट आणि फुटबॉलमध्येही खूप मेहनत लागते. पण, तुलना केल्यास क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना फार जोखीम घ्यावी लागत नाही. आपल्याकडे चांगले कौशल्य असल्यास सहजरित्या फलंदाजी करता येते. क्रिकेटमध्ये फिटनेस महत्त्वाचा नसतो असे मी म्हटले नव्हते, असे सायनाने सांगितले. 

तसेच क्रिकेटमधील मोजकेच खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे बनू शकतात. क्रिकेट पूर्णपणे स्कील बेस्ड स्पोर्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी जसप्रीत बुमराहसोबत का खेळावे. मला थोडी मरायचे आहे. मी आठ वर्षांपासून खेळत असते तर नक्कीच टीकाकारांना उत्तर दिले असते. जर बुमराहसोबत बॅडमिंटन खेळले तर तो कदाचित माझा स्मॅश शॉट खेळू शकणार नाही, असे सायनाने मिश्किलपणे म्हटले. 

सायना नेहवालने आणखी सांगितले की, आपण आपल्या देशात या गोष्टींवरून आपापसात भांडायला नको असे मला वाटते. प्रत्येक खेळ चांगलाच आहे पण इतरही खेळांना महत्त्व द्यायला हवे. तेव्हाच भारतात क्रीडा संस्कृती रूजेल. आमचे लक्ष नेहमीच क्रिकेट आणि बॉलिवूडवर असते. जर कोणी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले तर आम्ही कौतुक करतो. पण त्यानंतर काय होणार? चार-पाच पदकांवर आपण थांबायचे का? अजून पदके नकोत का? त्यात आपण आनंदी होऊ का? आपल्या देशात केवळ आणि केवळ क्रिकेटला महत्त्व दिले जाते. अन्य खेळांना सुविधा किंवा आर्थिक मदत केली जात नाही. क्रिकेटपटूंना जे सहकार्य मिळते ते इतर खेळाडूंना मिळत नाही. क्रिकेटप्रमाणे इतर खेळांनाही देशात चांगल्या सुविधा मिळाल्या, तर ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी सुधारेल आणि चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकण्यातही भारतीय खेळाडू यशस्वी होतील. 

Web Title: Paris Olympics 2024 Saina Nehwal slams cricket fans and her trolls for commenting on Jasprit Bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.