बेडवर उड्या मारल्या! ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी 'ते' बेड्स नाहीत हे दाखवलं; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 06:53 PM2024-07-23T18:53:27+5:302024-07-23T19:08:19+5:30

येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे.

  Paris Olympics 2024 star athlete rhys McClenaghan has shared a video  | बेडवर उड्या मारल्या! ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी 'ते' बेड्स नाहीत हे दाखवलं; काय आहे प्रकरण?

बेडवर उड्या मारल्या! ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी 'ते' बेड्स नाहीत हे दाखवलं; काय आहे प्रकरण?

Paris Olympics 2024 Updates : लवकरच पॅरिसच्या धरतीवर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू होत आहे. येत्या २६ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्टपर्यंत विविध देशातील खेळाडू पदकासाठी लढतील. ऑलिम्पिकमधील ॲथलीट्स व्हिलेज हे क्रीडा विश्वाचे नेहमी लक्ष वेधून घेत असते. याचे कारणही तितकेच खास आहे. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये कारणास्तव खेळाडूंना काही निर्बंध घालण्यात आले होते. तेव्हा साथीच्या आजारामुळे सक्तीच्या निर्बंधांमुळे सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, कालांतराने ही केवळ अफवा असल्याचे समोर आले. यंदा प्रेमाच्या शहरात पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडत आहे. 

खरे तर नेहमीप्रमाणे यावेळी देखील ऑलिम्पिक व्हिलेजबद्दल काही अफवा पसरवल्या जात असल्याचे दिसते. पॅरिस ऑलिम्पिक ॲथलीट व्हिलेजमधील बेड आकाराने लहान असतील आणि ते अशा साहित्यापासून बनवलेले असतील जे क्रीडापटूंना स्पर्धेदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करतात, अशी चर्चा आहे. मात्र, रायस मॅक्लेघन या खेळाडूने अफवांना पूर्णविराम दिला. रायस हा आयर्लंड आणि उत्तर आयर्लंड या दोन्ही देशांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना देण्यात आलेल्या बेड्सची चाचणी केली. त्याने अँटी सेक्स बेड असल्याचा दावा खोडून टाकला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील अँन्टी सेक्स बेडचा पुन्हा पर्दाफाश झाला असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक्समध्ये खेळाडूंना देण्यात आलेल्या बेडची बरीच चर्चा रंगली होती. पॉल चेलिमो या अमेरिकन धावपटूने म्हटले होते की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेदरम्यान खेळाडूंना लैंगिक संबंध ठेवण्यापासून रोखण्यासाठी हलक्या कमी दर्जाच्या गाद्या (बेड्स) ठेवल्या गेल्या होत्या. हाच प्रकार पॅरिसमध्ये दिसेल अशी चर्चा असताना रायस या खेळाडूने व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले. 

टोकियो ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना 'अँटी-सेक्स' बेड्स देण्यात आले असल्याची अफवा पसरली होती. पण, त्यावेळी देखील याच रायल मॅक्लेघनने क्रीडाग्राममध्ये त्याला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या खोलीतून एक व्हिडीओ शूट केला होता. त्यात त्याने कथित 'अँटी-सेक्स' कार्डबोर्ड बेडवर अगदी उड्या मारुन त्याची उच्चप्रतिची क्षमता आणि गुणवत्ता दाखवून दिली अन् सर्वांना विश्वास पटला. यामाध्यमातून मॅक्लेघनने सोशल मीडियात व्हायरल झालेल्या अँटी-सेक्स बेड्सच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचे आवाहन केले.

Web Title:   Paris Olympics 2024 star athlete rhys McClenaghan has shared a video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.