Paris Olympics 2024 : भारतीय खेळाडूंची 'धीमी चाल', २० किमी चालण्याच्या स्पर्धेत विक्रमवीरही ढेपाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:53 PM2024-08-01T12:53:31+5:302024-08-01T12:57:08+5:30

Paris Olympics 2024 Updates In Marathi : खराब वातावरणामुळे २० किमी रेस वॉक ही स्पर्धा उशीरा सुरू झाली. 

Paris Olympics 2024 Updates In Marathi India's Vikash Singh, Paramjeet Singh and Akshdeep Singh participated in the Men's 20km Race Walk  | Paris Olympics 2024 : भारतीय खेळाडूंची 'धीमी चाल', २० किमी चालण्याच्या स्पर्धेत विक्रमवीरही ढेपाळला

Paris Olympics 2024 : भारतीय खेळाडूंची 'धीमी चाल', २० किमी चालण्याच्या स्पर्धेत विक्रमवीरही ढेपाळला

Paris Olympics 2024 Day 6 Live Updates : खराब वातावरणामुळे पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेला उशीरा सुरुवात झाली. २० किमी रेस वॉक ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होणार होती. मात्र खराब हवामानामुळे वेळेत सुरुवात होऊ शकली नाही. भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० च्या सुमारास ही स्पर्धा सुरू होईल असे मानले जात होते. पण, स्पर्धा सुरू होण्यास आणखी उशीर झाला. अखेर ११.४५ च्या सुमारास स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या पाच किमीपर्यंत भारताचा विकास सिंग (२१ व्या स्थानी), परमजीत सिंग (४६ व्या स्थानी) आणि अक्षदीप सिंग (४९ व्या स्थानी) होता. (Men's 20km Race Walk News)

पण, अक्षदीप सिंग ६ किमीचा पल्ला गाठताच स्पर्धेबाहेर झाला. तो त्या पुढे चालू शकला नाही. २० किमी रेस वॉकमध्ये राष्ट्रीय पातळीवर रेकॉर्डधारक असलेल्या अक्षदीपने हार मानल्याने सगळेच अवाक् झाले. स्पर्धेच्या मध्याला विकास सिंग २९व्या तर परमजीत सिंग ४३ व्या स्थानी होता. 

१२ किमीपर्यंत काय परिस्थिती होती?
विकास सिंग (२८व्या स्थानी)
परमजीत सिंग (४१व्या स्थानी)
अक्षदीप सिंग (स्पर्धेबाहेर)

१७ व्या मिनिटापर्यंतची स्थिती
विकास सिंग (३१व्या स्थानी)
परमजीत सिंग (३७व्या स्थानी)

२० किमीपर्यंतचे अंतर गाठताना बहुतांश खेळाडू ढेपाळले. अखेरचे ५०० मीटर अंतर गाठताना केवळ मोजक्याच स्पर्धकांमध्ये लढत झाली. अखेर इक्वेडोरच्या खेळाडूने सर्वप्रथम अंतर गाठून विजय संपादन केला. तर ब्राझीलचा शिलेदार दुसऱ्या आणि स्पेनचा खेळाडू तिसऱ्या स्थानी राहिला. भारताच्या एकाही खेळाडूला पहिल्या २० मध्ये स्थान मिळवता आले नाही. भारताचा विकास सिंग ३० व्या स्थानी राहिला. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकचा आज सहावा दिवस आहे. गेल्या पाच दिवसात भारताने दोन पदके मिळवली आहेत. मनू भाकरने वैयक्तिक आणि सरबजोत सिंगसोबत एक कांस्य पदक जिंकले. 

Web Title: Paris Olympics 2024 Updates In Marathi India's Vikash Singh, Paramjeet Singh and Akshdeep Singh participated in the Men's 20km Race Walk 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.