Paris Olympics 2024 : सरपंच साहेब...! पदकविजेत्या हॉकी संघाला मोदींचा फोन; खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:59 PM2024-08-09T13:59:45+5:302024-08-09T14:00:26+5:30

india vs spain bronze medal match : भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा पराभव करून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले.

paris olympics 2024 updates in marathi prime minister narendra modi referring captain harmanpreet singh as sarpanch Saab, watch here video  | Paris Olympics 2024 : सरपंच साहेब...! पदकविजेत्या हॉकी संघाला मोदींचा फोन; खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

Paris Olympics 2024 : सरपंच साहेब...! पदकविजेत्या हॉकी संघाला मोदींचा फोन; खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

india vs spain bronze medal match news : भारताच्या हॉकी संघाला जर्मनीने उपांत्य फेरीत पराभूत करून सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले. तर स्पेनला नेदरलँड्सकडून उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कांस्य पदकासाठी गुरुवारी भारत आणि स्पेन यांच्यात लढत झाली. भारताने कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनचा २-१ असा पराभव करून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश मोक्याच्या क्षणी धावून आल्याने भारताची आघाडी कायम राहिली. श्रीजेशने स्पेनविरूद्ध त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळला. सामन्याच्या अखेरीस भारत २-१ अशा आघाडीवर कायम होता. पण, स्पेनला सलग दोनदा पेनल्टी कॉर्नर मिळाले अन् भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढली. मात्र, भारताचा गोलरक्षक श्रीजेश स्पेनच्या संघासाठी काळ बनून पुढे आला. त्याने अप्रतिम कामगिरी करताना गोल वाचवला अन् भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.

सुरुवातीला पहिला गोल करून आघाडी मिळवणाऱ्या स्पेनला पुन्हा एकही गोल करता आला नाही. अखेरपर्यंत स्पेनचे खेळाडू गोल करण्यासाठी तरसले. टीम इंडियाने सांघिक खेळीच्या जोरावर ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक पटकावले. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाला फोन करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदी यांनी कर्णधार हरमनप्रीत सिंगचा उल्लेख आवर्जुन 'सरपंच साहेब' असा केला. (PM Modi talks to Indian Hockey Team) 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही भारताचा गौरव केला. ऑलिम्पिकमधील पराभवाचे सत्र मोडीत काढले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सर्वजण भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ परत आणाल. हा विजय कौशल्य, जिद्द आणि सांघिक भावनेचा विजय आहे. या विजयामुळे तरुणांमध्ये या खेळाची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांनी कर्णधार हरमनप्रीत सिंगला सरपंच साहेब म्हणून संबोधले आणि गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या योगदानाची प्रशंसा केली.

Web Title: paris olympics 2024 updates in marathi prime minister narendra modi referring captain harmanpreet singh as sarpanch Saab, watch here video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.