Vinesh Phogat : "अलविदा कुश्ती!" विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:03 AM2024-08-08T08:03:18+5:302024-08-08T08:10:41+5:30

Vinesh Phogat : काल विनेश फोगाटला जास्त वजनामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले

paris olympics 2024 Wrestler Vinesh Phogat has announced his retirement | Vinesh Phogat : "अलविदा कुश्ती!" विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली!

Vinesh Phogat : "अलविदा कुश्ती!" विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली!

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीला अलविदा केले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विनेश फोगटने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सर्व काही तुटले आहे, आता माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. कुस्ती २००१-२०२४ ला अलविदा, मी ऋणी राहीन.", असं पोस्टमध्ये फोगाटने म्हटले आहे. (Paris Olympics) सोशल मीडियाच्या माध्यमातून विनेश फोगाटने कुस्तीला 'आई' असं संबाधले आहे.

विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोरदार खेळी करुन फायनल पर्यंत पोहोचली होती. फोगटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकाने जिंकला होता. ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. विनेश फोगाटने निवृत्ती जाहीर केल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, "विनेश, तू पराभूत झाली नाहीस, तुला पराभूत केलं, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची कन्या आहेस तसेच भारताचा अभिमान आहेस.", कुस्तीपटू बजरंग पुनियाने असंही पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारतीय कुस्ती संघाने केली होती अपील

विनेश फोगाटचं वजन फायनल मॅचपूर्वी १०० ग्रॅम अधिक आढळलं ज्यामुळे विनेशला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले. याबाबत भारतीय कुस्ती संघाकडून अपील करण्यात आलं होतं. विनेशला आणखी थोडा वेळ आणि सूट दिली जावी असं भारताने म्हटलं. तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA ने विनेश रात्रभर तिचं वजन नियंत्रित करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत होती परंतु सकाळी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचं निदर्शनास आले. (Vinesh Phogat )

आता यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंगचे अध्यक्ष नेनाद लालोविच यांनी स्पष्ट केले की, भारताकडून आलेली अपील आता काही कामाची नाही. मला भारताच्या अपीलाची अडचण नाही. परंतु त्याचा परिणाम काय असेल हे ठाऊक आहे. या प्रकरणात काही होऊ शकते असं मला वाटत नाही. हे स्पर्धेचे नियम आहेत आणि नियम बदलले जाऊ शकतात असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले.

Web Title: paris olympics 2024 Wrestler Vinesh Phogat has announced his retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.