पुन्हा Gold चे स्वप्न भंगले; अमन सेहरावतचा सेमी फायनलमध्ये पराभव, 'ब्राँझ'ची आशा कायम...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:10 PM2024-08-08T22:10:26+5:302024-08-08T22:15:25+5:30
कूस्तीच्या सेमी फायनलमध्ये जपानच्या रे हिगुची याने अमनचा 10-0 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
Aman Sehrawat Wrestling, Paris Olympics 2024 : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज(दि.8) कूस्तीच्या सेमी फायनलमध्ये 57 किलो वजनी गटात अमन सेहरावत (Aman Sehrawat) चा दारुण पराभव झाला आहे. जपानच्या रे हिगुची याने अवघ्या 1 मिनिट 14 सेकंदात अमनला 10-0 इतक्या मोठ्या फरकाने चितपट केले. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये अमनने अल्बेनियाच्या जेलिमखान एबकारोवचा 11-0 च्या फरकाने पराभव केला होता.
चक दे इंडिया! भारतानं हॉकीत 'ब्राँझ' जिंकलं; सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी
विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर सर्वांच्या नजरा अमन सेहरावतवर होत्या. त्याने सुरुवातीला क्वार्टर फायनल लढतीत अल्बेनियाच्या पैलवानाला मोठ्या फरकाने अस्मान दाखवले होते. त्याची खेळी पाहून सर्वांनी त्याच्याकडून पदकाची आशा ठेवली होती. पण, सेमी फायनलमध्ये जपानच्या पैलवानाने अमनचा 10-0 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला.
🇮🇳🥉 𝗖𝗮𝗻 𝗔𝗺𝗮𝗻 𝗦𝗲𝗵𝗿𝗮𝘄𝗮𝘁 𝗯𝗿𝗶𝗻𝗴 𝗵𝗼𝗺𝗲 𝗮 𝗕𝗿𝗼𝗻𝘇𝗲 𝗺𝗲𝗱𝗮𝗹? Aman Sehrawat moves to the Bronze medal match following a defeat against 1st seed, Rei Higuchi, in the semi-final.
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 8, 2024
🤼♂ Final score: Aman 0 - 10 Higuchi
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia… pic.twitter.com/xjjuAIaerA
सामन्याची सुरुवात होताच जपानच्या रे हिगुची याने आपली आक्रमक खेळी दाखवली. सुरुवातीच्या काही सेकंदात जपानच्या पैलवानाने 4 गुणांची आघाडी घेतली. यानंतर अमन जोरदार प्रत्युत्तर देईल असे वाटत होते, पण रे हिगुची याने आणखी गुण मिळवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. सामन्याच्या शेवटी अमनवर आपला अखेरचा डाव टाकत जपानच्या पैलवानाने 10 गुणांची आघाडी घेऊन सामना आपल्या नावाव केला.
अमनने हा सामना जिंकला असता, तर तो थेट अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी खेळला असता. पण, या सामन्यातील पराभवामुळे अमन आणि संपूर्ण भारताचे सूवर्णपदकाचे स्वप्न भंगले आहे. आता अमनला आणखी एक संधी मिळणार असून, तो कांस्य पदकासाठी मैदानात उतरले. उद्या म्हणजेच, 9 ऑगस्ट रोजी कांस्य पदकाचा सामना होईल. या सामन्यात तो कांस्य पदक जिंकेल, अशी सर्वांना आशा आहे.